Paris Olympics, Jay Shah BCCI: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या आठवड्यापासून पॅरिसमध्ये सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंचा संघ विक्रम मोडून पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. या दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कडून त्यांना मदत देण्यात आली आहे. बीसीसीआयने ऑलिम्पिक मोहिमेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) ८.५० कोटी रुपयांचे सहाय्य दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.
काय म्हणाले जय शाह?
जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की BCCI पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सर्वोत्तम खेळाडूंना पाठिंबा देत आहे. आम्ही या मोहिमेसाठी (ऑलिम्पिक) IOA ला ८.५० कोटी रुपये देत आहोत.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघ आणि सपोर्टिंग स्टाफला १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते. १५ खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आले. द्रविडने केवळ अडीच कोटी रुपये घेतल्याचेही सांगण्यात आले.