नवी दिल्ली : ज्युनियर विश्वचषकांत(१९ वर्षांखालील) खेळाडूंना केवळ एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआय कार्यकारिणीने नुकताच घेतला. यामुळे खेळाडूंच्या वयाची अफरातफर थांबेल असा विश्वास १९ वर्षे गटाच्या भारतीयसंघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. वयाची अट पाळण्याबाबत काटेकोर असलेला द्रविड म्हणाला,ह्य१९ वर्षांखालीलविश्वचषकात एकदाच खेळण्याची परवानगी असल्याने वय लपविणाऱ्या खेळाडूंना वचक बसेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास १९ वर्षे क्रिकेट हे निकालासाठी नव्हे तर संधीसाठी असते. येथे निकालाऐवजी अनुभवावर भर असावा. नव्या नियमांमुळे दूरगामी परिणाम येतील. बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे भावी पिढीतील क्रिकेटपटूंवर सकारात्मक परिणाम होतील. वय लपविणे ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बीसीसीआयने जी पावले उचलली त्याचे चांगले निकाल येतील.
१९ वर्षे गटात दोनदा खेळण्याचा विचार वाईट नाही. पण यामुळे इतरांना संधी मिळत नाही. खेळाडू १६ वर्षे गटात खेळताना कधी अस्थी चाचणी(बोन टेस्ट) करीत नाही. तो पुढे अनेक वर्षे १९ वर्षे गटातही खेळत राहतो. बीसीसीआयच्या निर्णयामुळे अशा खेळाडूंच्या गैरप्रकारांना खीळ बसणार आहे. १६ वर्षांत चांगला खेळाडू म्हणून पुढे येणारा खेळाडू पुढील दोन वर्षे १९ वर्षे गटातखेळणे वाईट नाही. पण १७ वर्षांच्या वयात खेळाकडे येणारे खेळाडू वारंवार १९ वर्षे गटात खेळत असतील तर अन्य खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो, असे द्रविडने नमूद केले.
दोनदा विश्वचषकात सहभागी झालेले खेळाडू
रवींद्र जडेजा २००६ आणि २००८, विजय झोल २००२ आणि २००४, संदीप शर्मा २०१०आणि २०१२, सर्फराज खान २०१४ आणि २०१६, रिकी भूई २०१४ आणि २०१६, आवेश खान२०१४ आणि २०१६.