शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

एक होता फेडरर... उद्धट, तापट आणि बेजबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 7:55 AM

सोप्या भाषेत सांगायचे तर जणू आपला सचिन! सचिनने कमावले तेच, तसेच प्रेम आणि तोच आदर फेडररनेही कमावला

रोहित नाईक, 

जर फेडरर या टेनिसविश्वाच्या अवलियाने आपल्या विक्रमी २४ वर्षांच्या कारकिर्दीला विराम दिला आणि अवघे क्रीडाविश्व हळहळले. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जेतेपद मिळवण्यामध्ये दुसरे स्थान, शंभराहून अधिक एटीपी जेतेपदे, एकेरीमध्ये एक हजारांहून अधिक विजय, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा आदरणीय (आणि सर्वाधिक वयाचा) खेळाडू, अशा अनेक विक्रमी कामगिरींची नोंद करत फेडररने टेनिसविश्वात आपली वेगळी जागा निर्माण केली. 

सोप्या भाषेत सांगायचे तर जणू आपला सचिन! सचिनने कमावले तेच, तसेच प्रेम आणि तोच आदर फेडररनेही कमावला! सचिनने निवृत्ती घेतली तेव्हा संपूर्ण देश स्तब्ध झाला होता, १५ सप्टेंबरलाही भारतीय टेनिस चाहत्यांची अवस्था काही वेगळी नव्हती! यावेळी निवृत्ती फेडररची होती! गेली २० हून अधिक वर्षे भारतीयांना टेनिसची गोडी लागली ती मुख्यत: फेडररमुळेच. फेडररची खास ओळख आहे ती एक विनयशील, सज्जन सद्गृहस्थ अशी! विजयाचा उन्माद नाही, पराजयाचा संताप नाही आणि प्रतिस्पर्ध्याशी लढताना चिवटपणा असला, तरी त्याला व्यक्तिगत खुन्नसचे रूप कधीही नाही. राग व्यक्त न करणारा, विनाकारण आक्रमक न होणारा, अशी त्याची ओळख; पण एकेकाळी हाच फेडरर अत्यंत उद्धट आणि बेजबाबदार होता, हे आज कोणाला खरे वाटणार नाही.आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबामध्ये ‘रॉजर’चा जन्म झाला. आई-वडिलांच्या प्रेमामुळे लाडावलेला रॉजर अक्षरशः पैसे उधळायचा. किशोरवयामध्येच त्याला टेनिसची गोडी लागली. तेव्हापासूनच त्याने जगातील सर्वोत्तम टेनिसपटू बनण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते; पण त्याचे बेजबाबदारपणाचे वर्तन बघून लोक त्याला हसण्यावारी नेत. 

रॉजर अत्यंत तापट स्वभावाचा होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडायचा. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक स्पर्धांमध्ये गुण गमावल्यावर त्याने कोर्टवरच अनेकदा रॅकेट फेकली आहे, तोडली आहे. त्यामुळेच त्याच्या पालकांनाही रॉजरच्या भविष्याची चिंता होती. त्यांनी शक्य होईल ते सर्वकाही आपल्या लाडक्या लेकासाठी केले; पण रॉजरला त्याची पर्वा नव्हती. यादरम्यान एक गोष्ट चांगली घडत होती. रॉजर सर्वाधिक वेळ आपल्या प्रशिक्षकांसोबत घालवू लागला. त्याच्या प्रशिक्षकांनी रॉजरची गुणवत्ता बरोबर हेरली.रॉजर त्याच्या स्वभावामुळे पूर्ण क्षमतेने खेळत नव्हता. ज्या स्पर्धा त्याने जिंकायला पाहिजे होत्या, त्यात तो सुरुवातीच्या फेरींमध्येच पराभूत होऊ लागला. त्यामुळे प्रशिक्षकाने सर्वांत आधी रॉजरला संयम बाळगण्यासह आनंदी राहण्याचे महत्त्व पटवले. 

रॉजरला आपली चूक कळली आणि त्याचा खेळ बहरत गेला. जेव्हा फेडररला आपला मार्ग योग्य दिशेने सुरू असल्याचे कळले, तेव्हाच एक दुर्दैवी घटना घडली. १ ऑगस्ट २००२ रोजी त्याच्या प्रशिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. हा धक्का रॉजरला पचण्यासारखा नव्हता. आता पुढचा मार्ग आपल्याला एकट्याने पूर्ण करायचा आहे, हा विचारच त्याला नैराश्यात ढकलणारा होता; पण त्याच्यासोबत कायम होते ते प्रशिक्षकाचे बोल आणि त्यांनी दिलेली शिकवण. 

रॉजरने आपल्या स्वभावात बरेच बदल केले. तो शांत झाला. आता जे काही करायचे ते आपल्या प्रशिक्षकासाठी हाच निश्चय त्याने केला. त्यामुळेच त्याने स्वत:ला बदलण्याचे ठरवले. अतिआक्रमकपणा कमी केला आणि २००३ साली पहिले ग्रॅण्डस्लॅम जिंकल्यानंतर त्याने काही महिन्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत रॉजरने आपला शब्द खरा केला. यानंतर अशी कोणती स्पर्धा उरली नाही जी रॉजरने जिंकली नाही.फेडररचे ‘ते’ प्रशिक्षक होते ऑस्ट्रेलियाचे पीटर कार्टर!

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत) 

टॅग्स :Tennisटेनिस