शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जिम्नॅस्टिकमधील एकमेव आशास्थान

By admin | Published: July 24, 2016 4:27 AM

आॅलिम्पिक स्पर्धेत भारताची मदार नेहमीच कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन व तिरंदाजी या खेळांवरच राहिली आहे. अमेरिका, रशिया व चीन हे देश जिम्नॅस्टिकमध्ये पदकांची लयलूट करीत असताना

- संतोष मोरबाळे, कोल्हापूरआॅलिम्पिक स्पर्धेत भारताची मदार नेहमीच कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन व तिरंदाजी या खेळांवरच राहिली आहे. अमेरिका, रशिया व चीन हे देश जिम्नॅस्टिकमध्ये पदकांची लयलूट करीत असताना भारत मात्र या खेळापासून कोसोदूर होता. जिम्नॅस्टिकमध्ये भारतातून एकाही खेळाडूला आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता. ही कोंडी फोडली त्रिपुराच्या दीपा कर्माकर हिने. २२ वर्षांची दीपा ही आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला आहे.दीपाची ही कामगिरी ऐतिहासिक असली तरी हा रस्ता सोपा नव्हता. तिचे पहिले प्रशिक्षक बिसवेश्वर नंदी यांना याचे श्रेय द्यावेच लागेल. तिने वयाच्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिकचा सराव करण्यास प्रारंभ केला. तिचे पाय सपाट असल्याने या खेळात तिला प्रावीण्य मिळवता येणार नाही, असे तिचे प्रशिक्षक बिसवेश्वर नंदी यांना वाटत होते. सपाट पायामुळे पाय रोवून उभारता येत नाही. त्यामुळे तिच्या पायांना हवा तसा आकार मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. दीपा याचे सर्व श्रेय प्रशिक्षक नंदी यांना देते. ‘जर नंदी यांनी मला प्रशिक्षण दिले नसते, तर मी कधीच खेळू शकले नसते,’ असे ती म्हणते. दीपाचे वडील ‘साई’मध्ये प्रशिक्षक होते. त्यांनीच तिला जिम्नॅस्टिकमध्ये कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहित केले.दीपाने २००७ मध्ये जलपैगुडी येथे ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले अन् तिची या खेळातील आवड वाढतच गेली. तिने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून ७७ पदके मिळवली आहेत. यामध्ये ६७ सुवर्णपदकांचा समावेश आहे. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ती भारतीय संघाची सदस्य होती. या स्पर्धेत भारताच्या आशिषकुमारने सुवर्णपदक पटकावल्यामुळे दीपाचा आत्मविश्वास आणखी वाढला. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून दीपा कर्माकरने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या दीपाने २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्ड जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत तिने पाचवा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या प्रोडूनोव्हा प्रकारात तिने १४ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले होते; मात्र बारवरील कामगिरीत ती कमी पडल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली. या स्पर्धेतील कामगिरीमुळे निराश न होता तिने आॅलिम्पिक पात्रता फेरीत उतरण्याचा निर्णय घेतला व या स्पर्धेत सर्वांगीण कामगिरी केली. आर्टिस्टिक गटात अव्वल आल्याने तिला आॅलिम्पिकचे दरवाजे उघडले गेले. माजी राष्ट्रीय विजेता, प्रशिक्षक व सरकारी निरीक्षक राम निवास यांनी सर्वप्रथम दीपामधील कौशल्य ओळखले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी तिला ‘साई’मध्ये प्रशिक्षण घेण्यासंदर्भात सुचविले. दीपाने त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या कामगिरीत तिने सातत्याने प्रगतीच केली. व्हॉल्ट या प्रकारातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या प्रोडूनोव्हा प्रकारात दीपा प्रभावी ठरलेली आहे. जागतिक स्तरावर काही मोजक्या खेळाडूंमध्ये तिची गणना होत आहे.लक्षवेधी...१) आॅलिम्पिकमध्ये ५२ वर्षांनंतर भारताला प्रतिनिधित्व२) स्वतंत्र भारताच्या ११ जणांनीच केले आॅलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व३) १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन, तर १९६४ मध्ये सहा जणांचा सहभाग४)आॅलिम्पिकला पात्र ठरणारी दीपा कर्माकर भारताची पहिली महिला जिम्नॅस्टिकपटू