नवी दिल्ली : दीर्घ प्रतीक्षित सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेची पाचवी फेरी मलेशियातील जोहर बाहरू येथे ११ ते १८ आॅक्टोबरदरम्यान होत आहे. स्पर्धेचा गतविजेता भारताच्या ज्युनियर संघाला पुन्हा एकदा शानदार कामगिरी करून जेतेपद कायम राखण्याची संधी असेल.आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतासह आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, अर्जेंटिना, मलेशिया आणि पाकिस्तान संघ सहभागी होतील. भारताला पाकविरुद्ध सलामीला लढत द्यावी लागणार आहे. ज्युनियर संघातील स्टार आणि बचाव फळीतील बलाढ्य खेळाडू दीपसान तिर्की याने स्पर्धेत चमकदार कामगिरीसह देशाला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. १७ वर्षांचा तिर्की म्हणाला, ‘‘आम्ही अनेक दिवसांपासून स्पर्धेची प्रतीक्षा करीत आहोत. मागच्या कामगिरीची पुनरावृत्ती करीत आम्ही जेतेपद टिकवून ठेवू, असा मला विश्वास आहे. कडवे आव्हान असेल याची जाणीव असली, तरी स्पर्धेबाबत फारच उत्सुक आहे. गतविजेता संघ या नात्याने स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल. आमचे लक्ष्य पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याचे असेल.’’(वृत्तसंस्था)
युवा हॉकीपटूंना संधी
By admin | Published: August 23, 2015 2:23 AM