मुंबई : प्रतिष्ठेची ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन नौकानयन (सेलिंग) चॅम्पियनशिप स्पर्धा तब्बल 19 वर्षानंतर भारतात होत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आठवडाभर ही स्पर्धा रंगेल. ऑप्टिमिस्ट क्लासमधील हा आंतरराष्ट्रीय रेगाटा महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्र/आर्मी यॉटिंग नोड यांच्या (एवायएन) मान्यतेने 13-20 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित केला जाईल.
इंटरनॅशनल ऑप्टिमिस्ट डिंघी असोसिएशनचा (आयओडीए) भाग असलेल्या आशियाई आणि ओशिनियन सदस्य राष्ट्रांसाठी ही स्पर्धा महाद्वीपीय (कॉन्टिनेंटल) स्पर्धा आहे. यापूर्वी, ही स्पर्धा भारतात 2003 मध्ये आयोजित केली होती. आठवडाभर चालणार्या या स्पर्धेत आशियाई आणि ओशनिया प्रदेशातील 13 देशांतील 105 स्पर्धात्मक नौकानयनपटू (सेलिंग) सहभागी होतील. हे सेलर 15 वर्षांपर्यंतचे असून अमेरिका, बेल्जियम, मॉरिशस आणि तुर्की आदी देशांतील आहेत. या व्यतिरिक्त अर्जेंटिना, थायलंड, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, तुर्की, जपान, कॅनडा आणि भारतातील सुमारे 25 अधिकारी आंतरराष्ट्रीय ज्युरी/रेस मॅनेजमेंटचा मुख्य भाग आहेत.
युवकांच्या उर्जेला खेळ, चारित्र्यनिर्मिती, साहसाची भावना जागृत करणे आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना सक्षम करून राष्ट्र उभारणीत योगदान देणे हे खेळाचे उद्दिष्ट आहे. सेिंलंग हा ऑलिंपिक खेळ आहे. या स्पर्धेद्वारे आम्हाला आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धांसाठी आमची तयारी दाखवण्याची आणि आमची सर्वोत्कृष्ट प्रतिभा जगासमोर मांडण्याची एक उत्तम संधी देईल, असे एवायएन आणि 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले कमांडिंग ऑफिसर कर्नल नछतर सिंग जोहल यांनी म्हटले. हे केवळ देशातील पर्यटनाला प्रोत्साहनच देणार नाही तर भविष्यात भारताला जागतिक दर्जाचे नौकानयन गंतव्यस्थान बनवण्यातही योगदान देईल, कर्नल जोहल पुढे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या पाठिंब्याव्यतिरिक्त, याटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) आणि नॅशनल ऑप्टिमिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा (एनओएआय) पूर्ण पाठिंबा आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात या ’पर्यावरण स्नेही’, ’स्वच्छ’ आणि ’हरित’ खेळाचा प्रचार करून मुंबई आणि महाराष्ट्रात खेळ म्हणून नौकानयनाला चालना देण्याचा प्रयत्न करताना तरुण आणि नवोदित खेळाडूंना प्रेरित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. देश, कर्नल जोहल म्हणाले.ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात 14 डिसेंबर 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे उद्घाटन समारंभाने होईल. सर्व 10 रेसेसमध्ये प्रति फ्लीट प्रति दिवस जास्तीत जास्त तीन रेस आयोजित केल्या जातील. ही स्पर्धा 19 डिसेंबर 2022 रोजी ठाकर्स, चौपाटी, मुंबई येथे संपेल. .
स्पर्धेचे वेळापत्रक
- मंगळवार, 13 डिसेंबर अधिकृत आगमन दिवस.नोंदणी आणि मोजमाप.
- बुधवार, 14 डिसेंबर नोंदणी आणि मोजमाप. टीम लीडर्सची बैठक आणि उदघाटन
- गुरुवार, 15 डिसेंबर फ्लीट रेसेस
- शुक्रवार, 16 डिसेंबर फ्लीट रेसेस
- शनिवार, 17 डिसेंबर टीम रेस
- रविवार, 18 डिसेंबर फ्लीट रेसेस आणि टीम रेससाठी राखीव.
- सोमवार, 19 डिसेंबर फ्लीट रेस आणि टीम रेससाठी राखीव. पारितोषिक वितरण व समारोप