नवी दिल्ली : लोढा पॅनेलच्या शिफारशींचे आकलन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या बीसीसीआयच्या समितीच्या बैठकीत सदस्यांच्या ‘कुलिंंग आॅफ पिरियड’बद्दल चर्चा करण्यात आली. यामध्ये सदस्यांचा कार्यकाल १२ वर्षांचा करण्यासह दोन पर्यायही सूचवण्यात आले आहेत.लोढा समितीने बीसीसीआयच्या सदस्यांचा कार्यकाल ९ वर्षांचा मर्यादित ठेवण्याची शिफारस केली होती. यामध्ये ३ वर्षांनंतर तीन वर्षे विश्रामकाल अर्थात ‘कुलिंंग आॅफ पिरियड’ घेण्याची शिफारस करण्यात आली होती. आजच्या बैठकित सहभागी झालेल्या एका सदस्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसला तरी या मुद्याच्या पर्यांयावर विचार करण्यात आला. प्रस्तावित ३ वर्षांऐवजी ४-४ वर्षांचे २ कार्यकाल देणे, त्यानंतर ४ वर्षांचा विश्राम काल व नंतर ४ वर्षांचा कार्यकाल असा एकूण १२ वर्षांचा कार्यकाल करण्याचा प्रस्ताव विचारार्थ आला होता. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मसुदा विधेयकातही हे प्रावधान आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय विश्रामकाल न ठेवता सलग ९ वर्षे कार्यकाल ठेवण्याचा प्रस्तावही चर्चेला आला होता. यावरही चर्चा झाली. बारा वर्षांचा प्रस्ताव अमान्य झाला तर सलग ९ वर्षांच्या प्रस्तावाचा पर्यायही देण्यात येणार आहे.
१२ वर्षांचा कार्यकाल करण्याचा पर्याय
By admin | Published: July 02, 2017 12:09 AM