ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 12 : भारत चॅम्पियन्स चषकाचा सध्या चॅम्पियन आहे. आमच्या संघात बलाढ्य तसेच क्षमतावान खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंमध्ये विजय खेचून आणण्याची क्षमता असल्याने फॉर्म टिकवून या स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद पटकवूशकतो, असे मत अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आपल्या स्तंभात हरभजनने पुढे लिहिले,ह्यया स्पर्धेत अव्वल रँकिंग असलेले आठ संघ सहभागी होतात. त्यामुळे जेतेपदाची संधी कुणालाही असते. जो संघ दडपणातही चांगली कामगिरी करेल त्याच्याच गळ्यात जेतेपदाची माळ पडू शकते याची जाणीव आम्हाला आहे. जेतेपदाबाबत भविष्यवाणी करण्यास सांगाल तर मी आनंदाने भारतीय संघाचेच नाव उच्चारेन. २०१३ मध्ये मिळविलेला हा चषक आम्ही पुन्हा एकदा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे.अध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ३६ वर्षांचा भज्जी पुढे म्हणाला,ह्य भारतीय संघाने इंग्लंडच्या परिस्थितीशी लवकरात लवकर एकरूप व्हायला हवे. स्थानिक सत्रात संघाने देखणी कामगिरी केली असल्याने आत्मविश्वास बळावला आहे. पण इंग्लंडच्या परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असेल. स्पर्धेच्या काही दिवस आधी तेथे दाखल झाल्यास परिस्थितीवरनियंत्रण मिळविणे सोपे जाईल. इंग्लंडमध्ये खेळपट्टी आणि हवामानाचे स्वरूप बदलणारे असते. त्यामुळे काही दिवस आधी दाखल होण्याचा लाभ होणार आहे, असे भज्जीने नमूद केले. चॅम्पियन्स चषकाचे आयोजन १ ते १८ जून या कालावधीत इंग्लंड तसेचवेल्समध्ये होईल
चॅम्पियन्स चषकाचा बचाव करण्याची आमच्यात क्षमता: हरभजन
By admin | Published: April 12, 2017 8:51 PM