प्रीमियर लीगमध्ये यंदा टॉटनहॅम हॉट्सपर संघाने लक्षवेधी कामगिरी केली असून, यामध्ये स्टार मिडफिल्डर ख्रिस्तियन एरिक्सनचे मोलाचे योगदान राहिले आहे. यंदाच्या मोसमात जबरदस्त सुरुवात केलेल्या टॉटनहॅमने सध्या जेतेपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेल्या चेल्सीपुढे तगडे आव्हान निर्माण केले. तसेच टॉटनहॅमनेच चेल्सीची सलग १३ विजयांची मालिका २-० अशा धक्कादायक विजयाने रोखली. अशाच प्रकारचा आणखी एक दिमाखदार विजय मिळवण्यास टॉटनहॅम सज्ज असून यावेळी त्यांच्यापुढे आव्हान आहे ते मँचेस्टर सिटीचे. विशेष म्हणजे गतसामन्यात एव्हर्टनविरुध्द झालेल्या ०-४ अशा एकतर्फी पराभवानंतर सिटी संघ दडपणाखाली असेल. मात्र, तरीही टॉटनहॅम सिटीला कमी लेखण्यास कमी लेखण्याची चूक करणार नाही. या सामन्याच्या निमित्ताने एरिक्सनशी केलेली बातचीत...यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला नमवणारा एकमेव संघ म्हणून टॉटनहॅमला यश आले. यामुळे मँचेस्टर सिटीविरुध्द तुमचा आत्मविश्वास कसा आहे?- प्रत्येक सामन्यात आम्हाला आत्मविश्वास असतो, कारण आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत. चेल्सीविरुध्दचा निकाल आमच्यासाठी मोठा आहे परंतु, संघातील प्रत्येकालाच सातत्य कायम ठेवण्याची जाणीव आहे. उर्वरित मोसमामध्ये त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहोत हे आम्ही सिध्द केले आहे. टॉटनहॅमला विजेतेपद पटकावण्याची कितपत संधी आहे? या आठवड्याअखेर तुम्ही गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी पोहचाल आणि अग्रस्थानावरील संघात व तुमच्यात ७ गुणांचा फरक असेल.- हे खूप लवकर होतय. अजूनही यंदाच्या मोसमातील बरेच सामने शिल्लक आहेत. पण, एकूणच आमची वाटचाल चांगली होत आहे. सध्या आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि अग्रस्थान आमच्या अवाक्यात आहे. त्यामुळे सध्या आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करु.तुम्ही चेल्सीला लवकरच गाठू शकाल असे वाटते का? - मला अशी चिन्हे दिसत आहेत. नक्कीच त्यांची बाजू मजबूत असून त्यांनी ते सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांची विजयी घोडदौड खंडित करणे गरजेचे आहे. चेल्सीला नमवता येणं शक्य असल्याचे आम्ही दाखवले आहे. (पीएमजी इएसपी)
आमचा संघ सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये
By admin | Published: January 21, 2017 5:06 AM