ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - प्रशिक्षक निवड आणि मैदानाबाहेरील इतर वादांचा कामगिरीवर परिणाम होणार नसल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली याने श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराटने हे वक्तव्य केले. श्रीलंका दौऱ्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे.
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात झालेला वाद आणि त्यानंतर रवी शास्त्रीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडीसाठी विराटने उघडपणे समर्थन दिले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत विराटवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याला उत्तर देताना विराट म्हणाला,"प्रशिक्षक निवड व इतर वादांचा माझ्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. माझ्या हातात बॅट आहे आणि त्याद्वारे चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मैदानाबाहेरील गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत."
I only have the bat in my hand, my job is to do my best, lot of speculations around: Virat Kohli pic.twitter.com/7tTga4Z4M6— ANI (@ANI_news) July 19, 2017
यावेळी रवी शास्त्रीसोबत याआधी काम केेलेले असल्याने एकमेकांशी जुळवून घेणे सोपे जणार असल्याचे विराटने सांगितले. तो म्हणाला," मी आणि रवी शास्त्रींनी याआधी एकमेकांसोबत काम केले आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांशी जुळवून घेणे सोपे जाईल." रवी शास्त्री भारतीय संघाचा संचालक असतानाच विराटकडे कसोटी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर शास्त्रीचे मार्गदर्शन आणि विराटची आक्रमक कप्तानी यांच्या जोरावर भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती.
#WATCH Virat Kohli and Ravi Shastri address the media in Mumbai. https://t.co/Z0WuLN71SA— ANI (@ANI_news) July 19, 2017
याच पत्रकार परिषदेत आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये भरत अरुण यांच्या निवडीसाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या रवी शास्त्रींनी आज पहिल्यांच याविषयी जाहीर मतप्रदर्शन केले. भरत अरुण यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी चांगली आहे. त्यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यापूर्वी एकदा कामगिरीवर नजर टाका म्हणजे त्यांची निवड का केली हे समजेल असे रवी शास्त्रींनी टीकाकारांना सुनावले आहे.
अधिक वाचा