नागपूर : महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनला वर्षभरापासून फुटीचे ग्रहण लागल्याने संघटनेची दोन शकले झाली. चार दिवसांपूर्वी संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या गटाने अध्यक्ष विजय डांगरे यांची उचलबांगडी केल्यानंतर आता डांगरे गटाने सूर्यवंशी यांच्यासह रतन लिगाडे आणि साहेबराव ठाकरे यांना बाहेरचा रस्ता दाखविला.रविवारी डांगरे यांच्या गटाची सिल्लारी येथे बैठक झाली. यावेळी २१ जिल्हा प्रतिनिधी हजर राहिल्याचा दावा करीत संघटनेविरुद्ध कारवाई केल्याचा ठपका ठेवून सूर्यवंशी यांच्याऐवजी पुण्याचे प्रा. नीलेश जगताप यांच्याकडे महासचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय संघटनेविरुद्ध काम केल्याबद्दल कार्यकारिणीतील संजय नाईक (मुंबई), मनीष जोशी (अमरावती), दिलीप देशमुख (बुलडाणा), रतन लिगाडे (धुळे) यांनादेखील बडतर्फ करण्यात आले. पुण्याचे क्रीडा उपसंचालक विजय संतान व जळगावचे प्रा. देवदत्त पाटील यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई विभागाचे सचिव म्हणून दिनकर देशपांडे आणि अमरावती विभागाचे सचिव म्हणून अकोल्याचे संतोष गजभिये यांची नियुक्त झाली. कोर्ट व पोलिस कारवाईचा सामना करीत असलेले अकोल्याचे साहेबराव ठाकरे यांनाही हाकलण्यात आले आहे. त्यांच्याकडे संघटनेच्या पंच बोर्डाच्या प्रमुखपदाचा कारभार होता. ही जबाबदारी आता नागपूरचे पी. एस. पंत यांच्याकडे राहील. मुंबई उपनगरचे अध्यक्ष असलेले संतोष शेट्टी यांना संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहे. कोषाध्यक्षपदी सुनील हांड े(नागपूर) आणि सहसचिवपदी सतीशसिंग पवार (गडचिरोली) हे कायम आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)व्हॉलिबॉल फेडरेशनला फुटीचे ग्रहणदरम्यान, महाराष्ट्र संघटनेप्रमाणे व्हॉलिबॉल फेडरेशन आॅफ इंडियाला (व्हीएफआय)देखील फुटीचे ग्रहण लागले आहे. व्हीएफआय अध्यक्ष अवधेशकुमार चौधरी (डेहराडून) हे डांगरे गटाच्या बाजूने असून, महासचिव रामअवतारसिंग जाखड (राजस्थान) हे सूर्यवंशी गटाच्या मागे उभे असल्याचे चित्र आहे. फेडरेशनची मान्यता आपल्यालाच असल्याचा दोघांचा दावा आहे.अधिकृत आमसभा असल्याचा दावाअध्यक्ष विजय डांगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली राज्य व्हॉलिबॉल संघटनेची ही अधिकृत आमसभा असल्याचा दावा डांगरे गटाने केला आहे. भारतीय व्हॉलिबॉल महासंघाचे पदाधिकारी प्रणवदीप कुमार हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते, अशी माहिती कोषाध्यक्ष हांडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
सूर्यवंशी, लिगाडे, ठाकरे यांना दाखविला बाहेरचा रस्ता
By admin | Published: January 10, 2017 1:44 AM