हाँगकाँग : २-० अशा भक्कम आघाडीनंतरही चिनी तैपेई संघाविरूद्ध २-३ अशा फरकाने पराभव पत्करावा पत्करावा लागल्याने आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान गुरूवारी संपुष्टात आले.युवा खेळाडू अश्मिता चलिहा तसेच अरूण जॉर्ज-संयम शुक्ला यांच्या जोडीने पहिल्या दोन लढती जिंकून भारताला २-० अशी शानदार आघाडी मिळवून दिली होती. त्यावेळी भारत हा सामना जिंकणार, अशी चिन्हे होती. मात्र, नंतरच्या तिन्ही लढतींत पराभूत झाल्याने भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला. अटीतटीच्या सामन्यात भारतावर विजय मिळविणाऱ्या चिनी तैपेई संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.आसामची खेळाडू असलेल्या अश्मिताने महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत येओ जिया मीन हिच्यावर २१-१८, १७-२१, २१-१९ अशी निसटती मात केली. येओ मीन हीने जबरदस्त पुनरागमन केल्यानंतर निर्णायक गेममध्ये खेळ उंचावत अश्मिताने लढत जिंकली. त्यानंतर पुरूष दुहेरी सामन्यात अरूण-संयम जोडीने लियाओ मीन चून-चिंग हेंग या जोडीला २१-१७, १७-२१, २१-१४ असे नमविले.या लढतीनंतर मात्र, भारताचा तीन वेळचा राष्ट्रीय विजेता सौरभ वर्मा पुरूष एकेरीत वांग झू वेई याच्याकडून २१-७, १६-२१, २३-२१ असा पराभूत झाला. यानंतर सलग दोन लढती गमावल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)सलामीलाही पराभवमहिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरीच्या लढतीही गमावल्याने भारतावर २-३ अश फरकाने हा सामना गमावण्याची वेळ आली. यापूर्वी ‘अ’ गटातील आपल्या पहिल्या सामन्यातही भारत सिंगापूरविरूद्ध २-३ अशा फरकानेच पराभूत झाला होता.
भारतीय संघ स्पर्धेबाहेर, आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:14 AM