शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

‘ओव्हरवेट’ विनेश फोगट पात्रता स्पर्धेतून बाद

By admin | Published: April 24, 2016 4:01 AM

भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगट हिचे निर्धारित वजनगटापेक्षा अधिक वजन भरल्यामुळे विश्व आॅलिम्पिक पात्रता कुस्तीतून तिला बाद ठरविण्यात आले.

उलनबटेर(मंगोलिया) : भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगट हिचे निर्धारित वजनगटापेक्षा अधिक वजन भरल्यामुळे विश्व आॅलिम्पिक पात्रता कुस्तीतून तिला बाद ठरविण्यात आले. अन्य महिला मल्लांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कुणालाही आॅलिम्पिकचे तिकीट मिळू शकले नाही. ४८ किलो वजन गटात आखाड्यात उतरलेल्या विनेशचे वजन अन्य मल्लांच्या तुलनेत ४०० ग्रॅम अधिक होते. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले. ४८ किलो वजन गटात पात्रता मिळविण्यासाठी आता इस्तंबूल येथे ६ ते ८ मे या कालावधीत होणाऱ्या अखेरच्या स्पर्धेत भारताला संधी असेल; पण भारतीय मल्लाला कोटा मिळण्याची शक्यता कमीच आहे. विनेश आणि तिच्या कोचला घडलेल्या प्रकाराबद्दल तंबी देण्यात आली आहे. विनेश आणि कोचमुळे भारताला रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयश आले. तिचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे तंबी देऊन सोडण्यात आले आहे. विनेशनेदेखील आणखी एक संधी दिल्यास आॅलिम्पिक कोटा मिळविण्यात कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही, या शब्दांत कुस्ती महासंघाला विनंती केली आहे. इस्तंबूल येथील पात्रता स्पर्धेत २०० टक्के कामगिरी करण्याचे आश्वासन विनेशने महासंघाला दिले आहे. तेथे ती अपयशी ठरल्यास भारतात परतताच तिला नोटीस बाजवण्यात येईल, असे हा अधिकारी म्हणाला.भारतीय महिला कुस्ती पथकातील विनेश फोगट, बबिता फोगट आणि गीता फोगट या सध्या सोफियात सराव करीत आहेत. दरम्यान बबिता (५३ किलो), गीता (५८ किलो), अनिता (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो), ज्योती (७५ किलो) या पदकाच्या दावेदारीतून बाद झाल्या आहेत. बबिता, गीता व ज्योती रेपेचेज फेरीत पराभूत झाल्या. अनिता आणि नवज्योत सलामीलाच चीत झाल्या. बबिताने कोरियाची शिन्हाई ली हिला ५-० ने पराभूत केले; पण पुढच्या कुस्तीत ती अमेरिकेची हेलन लुईस हिच्याकडून ०-१० ने पराभूत झाली. इस्तंबूल येथे पुढील महिन्यात होणाऱ्या पात्रता सामन्यासाठी ४८ किलो गटात दुसऱ्या महिला मल्लाला पाठविण्याचा महासंघ विचार करीत आहे काय, असे विचारताच हा अधिकारी म्हणाला,‘विनेश आणि दुसऱ्या मुलीच्या कामगिरीत मोठा फरक आहे. अखेरच्या क्षणी अन्य कुणाला व्हिसा मिळणेही कठीण आहे. याशिवाय विनेश आॅलिम्पिक मल्लांच्या कोअर ग्रुपमध्ये आहे.