शहरं
Join us  
Trending Stories
1
"अक्षय शिंदेचा एन्काऊंटर मोठं षडयंत्र, कोणालातरी वाचवाय..."; संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले
2
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
3
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
4
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
5
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
6
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
7
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
8
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
9
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
10
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
11
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
12
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
13
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
14
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
16
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
17
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
18
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
19
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
20
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर

पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यावर भारताची मदार

By admin | Published: March 01, 2016 3:03 AM

दुखापतीमुळे माघार घेतलेली फुलराणी सायना नेहवाल हिच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत हे आजपासून सुरू होणाऱ्या जर्मन ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत

मुलहेम अ‍ॅन डेर रुहर (जर्मनी) : दुखापतीमुळे माघार घेतलेली फुलराणी सायना नेहवाल हिच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत हे आजपासून सुरू होणाऱ्या जर्मन ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पात्रता फेरीतून भारतीय आव्हानाला सुरुवात करतील. गेल्या वर्षी पायाला झालेल्या दुखापतीमुळे जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू सायनाने यंदा कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली नाही. शिवाय, सध्या ती प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच सायनाच्या अनुपस्थितीत भारतीय महिला एकेरीचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी सिंधूवर आहे. या वर्षी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावल्यानंतर सिंधूचा खेळ अचानक खालावला. यादरम्यान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) सिंधूला आपल्याच देशाच्या ऋत्विका शिवानी गड्डेविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यानंतर झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सिंधूला जपानच्या नोजोमी ओकुहारा आणि कोरियाच्या जी ह्यून सुंग यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबर, सय्यद मोदी ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच थायलंडच्या निचाओन जिंदापोलने नमविल्याने सिंधूला स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळेच जर्मन ओपन सिंधूसाठी आव्हानात्मक असेल.