शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत

By admin | Published: November 29, 2014 1:06 AM

गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून चीनच्या हॅन लीचा 3 गेममध्ये पराभव करून मकाऊ ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या एकेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

मकाऊ : गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने  उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून चीनच्या हॅन लीचा 3 गेममध्ये पराभव करून मकाऊ ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या एकेरीच्या  उपांत्यफेरीत प्रवेश केला. 
जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने चीनची पाचवी मानांकित हॅन ली हिचा एका तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या लढतीत 21-17, 19-21, 21-16 असा पराभव करून अंतिम चारमध्ये आपली जागा निश्चित केली. या स्पर्धेत द्वितीय मानांकन असलेल्या सिंधूची उपांत्यफेरीत सामना कॅनडाच्या मिशेल ली आणि थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपान यांच्यातील विजेत्याविरुद्ध होईल.
उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूने सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करीत 5-क् अशी गुणस्थिती केली; परंतु चीनच्या हानने उत्कृष्ट खेळ करीत 6-5 अशी एका गुणाची आघाडी घेतली; पण हॅन ही आघाडी  जास्त वेळ  टिकवू शकली नाही. सिंधूने सलग गुण मिळवून पहिली गेम 21-17 अशी जिंकली. दुस:या गेममध्ये सिंधूने पुन्हा 11-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर हॅनने जिगरबाज खेळ करून सलग 5 गुण मिळवून बरोबरी साधली. सूर गवसलेल्या हॅनने शेवटी ही गेम 21-19 अशी जिंकली. 
तिस:या आणि निर्णायक गेममध्ये सुरुवातीला हॅन 6-3 गुणांनी पुढे होती. मात्र, सिंधूने नेटजवळ प्लेसिंग आणि काही जोरदार स्मॅश मारून हॅनची आघाडी मोडीत काढून 14-8 गुणांची आघाडी आपल्याकडे घेतली. नंतर मात्र सूर गवसलेल्या सिंधूने 
सलग 4 गुण घेत हॅनला कोणतीही संधी न देता गेम 21-16 अशी 
जिंकली. (वृत्तसंस्था)