नवी दिल्ली : विश्वविजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चीन ओपन विश्व टूर सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार असून तिची नजर पुन्हा एकदा जेतेपदावर असेल. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूने गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक पटकावले.चीन ओपन २०१६ ची विजेता सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात चीनच्या ली शुएरुईविरुद्ध करेल. शुएरुई माजी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती व जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आहे. सिंधू २०१२ मध्ये चीन ओपनमध्ये तत्कालीन आॅलिम्पिक चॅम्पियन शुएरुईचा पराभव करीत प्रकाशझोतात आली होती. शुएरुईने सिंधूविरुद्ध आतापर्यंत सहापैकी तीन जिंकले आहेत. तीन सामन्यांत सिंधूने बाजी मारली आहे.जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील सायना नेहवाल दुखापतीतून सावरल्यानंतर छाप सोडण्यास उत्सुक असेल. सायना सलामीला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुगफामविरुद्ध खेळायचे आहे.
चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवण्याचे पी. व्ही. सिंधूचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:11 AM