- निलेश कुलकर्णी
लेफ्ट आर्म स्पिनर्ससाठी ही सगळ्यात अभिमानाची बाब आहे. जेव्हा आपण सगळे आपल्या दोन खेळाडूंनी जे मिळवले आहे त्याचा आनंद साजरा करतो. आपल्यातील अनेक जण डावखुऱ्या फिरकीकडे वळलो ते राजिंदर गोयल आणि पॅडी शिवलकर याच्याकडे बघूनच, हा आपल्यासाठी एक भावनिक क्षण आहे. आणि त्यांच्यासाठी देखील. दोघांना त्यांच्या कौशल्याबद्दल पोच मिळाली. आणि त्याच्या योगदानाचा योग्य तो सन्मान करण्यात आला.
माझ्यासाठी पॅडी सर मुंबईहून येणे हा माझ्या करीयरवर झालेला एक चांगला आणि मोठा परिणाम होता. आम्ही ज्यांना एकले, पाहिले आणि त्यांचे निरीक्षण केले. अनेक प्रकारे पॅडीसर आणि गोयल सर यांची कारकीर्द ही ग्रीक शोकांतिकेप्रमाणे होती. कारण ते चुकीच्या कालखंडात जन्मले. ते जर दुसऱ्या काळात असते तर ते आपल्या देशासाठी आणखी खेळले असते आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी अनेक सामने जिंकले देखील असते. त्यांचे कौशल्य त्याच तोडीचे होते. पण येथे जेव्हा आम्ही त्यांच्या कौशल्याचे नेहमीच प्रशसंक राहिलो आहोत.१९६० आणि १९७० च्या दशकात संघात एकाचवेळी दोन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवायचे नाहीत हा एक विचार होता. त्या काळात महान खेळाडू बिशनसिंग बेदी हे राज्य करत होते. त्यामुळे निवडकर्त्यांकडून एका वेळी शिवलकर किंवा गोयल यांनाच संधी मिळत होती. त्यावेळी निवड कर्त्यांना नेमके काय झाले होते हे कळत नाही. एकाच वेळी संघात दोन डावखुऱ्या गोलंदाजांना संघात न खेळवण्याचे निवडकर्त्यांचे त्यावेळचे निर्णय हे गोंधळात टाकणारे होते. त्या आधीच्या काळात किंवा त्यानंतरही आपल्या संघात दोन डावखुरे गोलंदाज राहिलेले आहेत. त्यात प्रसिद्ध म्हणजे रवि शास्त्री हे व्ही. राजू यांच्या सोबत खेळत. तर त्यानंतरचे उदाहरण म्हणजे रविंद्र जाडेजा आणि प्रज्ञान ओझा हे होय. फक्त डावखुरे फिरकीपटूच नाही तर एकाचवेळी दोन आॅफ स्पिनर्स आणि लेग स्पिनर्सदेखील संघासाठी खेळलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकाच काळात दोन यशस्वी आॅफ स्पिनर्स इरापल्ली प्रसन्ना आणि वेंकटराघवन हे एकाच संघात अनेकवेळा होते. पण दोन डावखुऱ्या गोलंदाजांना एकाच संघात खेळवण्यास नकार होा. पण हे नेहमीसाठी नव्हते. दोन्ही चॅम्पियन्स खेळाडूंनी अनेकदा आपल्या राज्य संघासाठी रणजीत गडी बाद केले आहेत. आपल्या बळावर राज्य संघाला सामने देखील जिंकून दिले आहेत. पॅडी सरांचा हा मोठा सन्मान असेल कारण ते रणजी चषकात मुंबईसाटी एका योद्ध्याप्रमाणे लढले आहेत. ते अनेक अडथळ्यांशीदेखील लढले आहेत, विशेषत: त्या काळात रणजी चषकात जो चेंडू वापरला जात होता. ते अनेक प्रकारच्या चेंडुंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. ते सध्या जो एसजी बॉल वापरला जातो त्याने देखील खेळले आहेत. हा चेंडू सीमसाठी चांगला मानला जातो. ते एक महान गोलंदाज होते. कारण त्यांनी बदल स्विकारले आणि त्याप्रमाणे खेळ केला. ते नेहमीच विपरीत परिस्थीतीत खेळले आहेत. आणि सर्व प्रकारच्या वातावरणात आणि फलंदाजीसाठी उपयुक्त खेळपट्ट्यांवरही यश मिळवले आहे. त्यांचा पॅडी सरांच्या गोलंदाजीतलाहाच पैलु आपल्याला प्रेरणादायी ठरतो. एक युवा डावखुरा गोलंदाज म्हणून माझ्यासाठी पॅडी सर आदर्श आहेत. मी त्यांच्या क्लृप्त्या, त्यांचा खेळ पाहणे आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या खेळाडूला बाद करण्याची त्यांची क्षमता आणि बाद करण्याचे नियोजन हे अफलातून होते. मला आठवते जेव्हा त्यांनी मुंबई संघात ४४ - ४५ व्या वर्षी पुनरागमन केले होते. तेव्हा त्यांच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे होते. मात्र त्यांनी सामने जिंकवून दिले. या वयात सामने जिंकून देणे हे त्यांच्या अफलातून क्षमतेचे आणि दृढतेचे प्रतिक होते. मी त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक संभाषणाचा आनंद घेतो. हा माणूस कौशल्याचा एनसायक्लोपिडीया आहे. या माणसाशी चर्चा करुन किंवा त्यांचे निरीक्षण करुन तुम्हाला कळते की, त्यांनी आपले ज्ञान कसे वाढवले आहे.’’त्यांच्यातील सर्वात उत्तम बाब म्हणजे, जेव्हा पॅडी सर आपल्या पुनरागमनात टाईमशिल्ड स्पर्धेत उतरले. त्यावेळी त्यांनी पुर्वी प्रमाणेच तयारी केली. त्याचप्रमाणे गोलंदाजी आणि उत्तम नियोजन देखील केले. हे खरोखर अवर्णनीय होते. त्यांनी मुंबईसाठी केलेल्या उत्तम प्रदर्शनाबाबत मी वाचले आहे. पॅडी सरांच्या खेळातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही त्यांना पाहून शिकु शकता. मी त्यांना खेळताना पाहिले आहे. विशेषत: कंपनी क्रिकेटमध्ये ते खेळले तेव्हा.चेंडुला उसळी देतांना त्यावर त्यांचे जबरदस्त नियंत्रण असायचे. त्याच्या मदतीने ते आर्म बॉल करत असत ते त्यांचे खास अस्त्र होते. मी नशीबवान आहे की मला पॅडीसरांकडून अनेक गोष्टी घेता आल्या. ते कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना आपल्या कौशल्यात बदल करत नसते हे विशेष होते. मग ते मुंबईकडून खेळत असो किंवा टाईम शिल्ड मध्ये किंवा कंपनी क्रिकेटमध्ये त्यांच्या खेळात बदल होत नसे. हा त्यांच्यातील एक उत्तम गुण होता. कदाचित त्यामुळेच पॅडीसर आणि गोयल यांचे चाहते वेगवेगळे होते.
(लेखक माजी कसोटीपटू आहेत.)