ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2017-18 साठी आपल्या 35 खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानच्या खेळाडूंना अल्प मानधन देण्यात आल्याचे चित्र दिसतेय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहिर केलेल्या करारातून मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलला वगळण्यात आले आहे. पाकिस्ताननं भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयकडून अ, ब आणि क गटातील खेळाडूंचे मानधन दुप्पट केले होते. अ गटातील खेळाडूंना 2 कोटी, ब गटातील खेळाडूंना 1 कोटी, तर क गटातील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देण्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. तसेच बीसीसीआय प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख , एकदिवसीयसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख इतके मानधन देण्याचेही जाहीर केले होते. हा झाला भारतीय खेळाडूंना मिळणारा वार्षिक पगार पण तुम्हाला आता चॅम्पियन झालेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंचा वार्षिक पगार माहित आहे का? पाकच्या खेळाडूंचा पगार वाचून बीसीसीआचा तुम्हाला आभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.