शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पाक-विंडीजला विजयाची प्रतीक्षा

By admin | Published: February 21, 2015 2:27 AM

विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पराभवाचे तोंड पाहणाऱ्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाला विजयाची प्रतीक्षा आहे.

ख्राईस्टचर्च : विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पराभवाचे तोंड पाहणाऱ्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाला विजयाची प्रतीक्षा आहे. उद्या शनिवारी ब गटात उभय संघ कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.पाकला भारताकडून ७६ धावांनी पराभवाचा धक्का बसला, तर विंडीजला आयर्लंडने ३०० वर धावांचे लक्ष्य गाठून धूळ चारली होती. पहिल्या पराभवानंतर पाक संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर तसेच विंडीज खालून दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी उद्याची लढत निर्णायक असेल. पाक संघात सईद अजमल राहणार नसून, अव्वल फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची विंडीजला उणीव जाणवणार आहे. या दोन्ही गोलंदाजांची शैली सदोष असल्याने आयसीसीने त्यांना निलंबित केले आहे. सिनियर खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीजचे नेतृत्व युवा जेसन होल्डरकडे आहे. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, लेंडल सिमन्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मर्लेन सॅम्युअल्स, डेरेन सॅमी या खेळाडूंच्या उपस्थितीत विंडीजचा फलंदाजी क्रम भक्कम वाटतो. गोलंदाजीची भिस्त पहिल्या सामन्यात बाहेर बसलेला सुलेमान बेन आणि केमर रोच यांच्याकडे असेल.उद्याच्या लढतीबद्दल जेसन म्हणाला, ‘आर्यलंडविरुद्धचा पराभव डोक्यात न ठेवता पाकवर विजय मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा प्रयत्न असेल.’ दुसरीकडे पाकच्या फलंदाजीची भिस्त अनुभवी युनूस खान, कर्णधार मिस्बाह उल हक आणि वन डेत आठ हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ असलेल्या शाहीद आफ्रिदीवर असेल. कर्णधार मिस्बाह म्हणाला, ‘विश्वचषकात पुढचा पल्ला गाठायचा झाल्यास उद्या विजय आवश्यक राहील. एकंदरीत उभय संघांसाठी‘ करो या मरो’ अशीच ही लढत ठरणार आहे. (वृत्तसंस्था) ४पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत १२६ एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानने ५५ सामने जिंकले असून ६८ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तीन लढती टाय झाल्या आहेत. ४विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ ९ वेळा एकमेकांसमोर ठाकले आहेत. यामध्ये पाकिस्तानने ३ वेळा तर वेस्टइंडिजने ६ वेळा विजय नोंदविला आहे. ४ पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहजाद, एहसान अदील, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, मोहम्मद इरफान, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहिद आफ्रिदी, शोएब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल (यष्टीरक्षक), बाहब रिआज, यासीर शाह, युनिस खान४ वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), मार्लोल सॅम्युअल्स (उपकर्णधार), सुलेमान बेन, डॅरेन ब्रावो, जॉनथन कार्टर, शेल्डन कोट्रेल, क्रिस गेल, निकिता मिलर, दीनेश रामदीन (यष्टीरक्षक), केमार रोच, अँड्रे रसल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्ॅवन स्मिथ, जेरॉम टेलर