शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

2019 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्यात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज अपयशी

By admin | Published: April 12, 2017 10:58 PM

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 12  - पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिल्याने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत. आता पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता स्पर्धेच्या दिव्यातून जावे लागणार आहे. 
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका  नुकतीच आटोपली. या मालिकेत पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर 2-1 ने मात केली. मात्र या विजयामुळे पाकिस्तानच्या क्रमवारीत मोठा बदल झाला नाही. जर पाकिस्तानने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली असती तर पाकिस्तानला विश्वचषकासाठी पात्र ठरता आले असते. 
विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी संघांची 1 मे 2014 ते  1 मे 2017 या काळातील कामगिरी विचारात घेण्यात आली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळतील. या स्पर्धेमध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजसह अन्य 10 संघ सहभागी होतील.