मलिकचा पाकला घरचा आहेर : सईद अजमल, हाफीजची उणीव भासणारकराची : संघातील अनुभवी खेळाडू सईद अजमल आणि मोहंमद हाफीज वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता नाही़ त्यामुळे पाकिस्तान संघ दुबळा बनला आहे़ याच कारणामुळे पाक आगामी वर्ल्डकप जिंकू शकणार नाही, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने व्यक्त केले आहे़ दक्षिण आफ्रिका, भारत किंवा आॅस्ट्रेलिया या संघांपैकी एक टीम आगामी वर्ल्डकपचे अजिंक्यपद मिळवील, असेही शोएबने म्हटले आहे़ त्याने पुढे सांगितले की, मला पाकिस्तान जेतेपद मिळविताना बघायचे आहे़ मात्र, अजमल आणि हाफीज हे महत्त्वाचे खेळाडू संघात नसतील, त्यामुळे हा संघ कमकुवत बनला आहे़ त्यामुळे देशाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही़ अजमल, हाफीजला संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे निलंबनाचा सामना करावा लागला आहे़ त्यामुळे दोघांनाही वर्ल्डकप संघात स्थान मिळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे़ पाकिस्तान ७ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे़ शोएब सध्या पाकिस्तान संघातून बाहेर आहे़ त्याने राष्ट्रीय संघाकडून आपला अखेरचा सामना जून २०१३ मध्ये खेळला होता़ मात्र, वर्ल्डकपसाठी जाहीर केलेल्या संभाव्य संघात त्याला स्थान मिळाले आहे़ त्यामुळे अंतिम १५ खेळाडूंत जागा मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे़ (वृत्तसंस्था)विशेष म्हणजे शोएब मलिक वर्ल्डकप खेळू इच्छित नाही, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होते़ यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, खेळाच्या या महाकुंभात प्रत्येकालाच खेळण्याची इच्छा असते़ मलाही या स्पर्धेत खेळायचे आहे़ मात्र, गत काही दिवसांपासून संघाच्या बाहेर असल्यामुळे निराश आहे, असेही त्याने सांगितले़ दरम्यान, पाकिस्तान संघ निवडीच्या प्रक्रियेवरही शोएबने नाराजी व्यक्त केली़
पाकिस्तान वर्ल्डकप जिंकू शकणार नाही
By admin | Published: January 02, 2015 2:13 AM