शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी

By admin | Published: June 19, 2017 1:09 AM

अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.

लंडन : गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनंतर कागदावर बलाढ्य भासणारे भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानने साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला. दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. पाक संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळला. भारतीय डावात हार्दिक पांड्याचा (७६ धावा, ४३ चेंडू, ४ चौकार, ६ षट्कार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिसऱ्याच चेंडूवर मोहम्मद आमिरने रोहित शर्माला (०) खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतवले. सुदैवी ठरलेल्या कोहलीला (५) पुढच्याच चेंडूवर आमिरने तंबूचा मार्ग दाखवीत भारताची २ बाद ६ अशी अवस्था केली. त्यानंतर आमिरने शिखर धवनचा (२१) अडथळा दूर करीत भारताची आघाडीची फळी कापून काढली. एकवेळ भारताची ६ बाद ७२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करीत रंगत निर्माण केली. आक्रमक अर्धशतकी खेळी करणारा पांड्या धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. पाकिस्तानतर्फे आमिर व हसन अली यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शादाब खानने दोन तर जुनेद खानने एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली. तत्पूर्वी, फखर झमानने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत आकर्षक शतकी खेळी केली. पाकिस्तानने भारताच्या सुमार गोलंदाजी व ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत रविवारी ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली. फखर झमानने १०६ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व ३ षट्कारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली. त्याने अझहर अलीसोबत (५९) सलामीला १२८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद हफीज (नबााद ५७), बाबर आजम (४६) आणि इमाद वसीम (नाबाद २५) यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले. भारतीय गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात काही अंशी यशस्वी ठरला. त्याने ४४ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निराशाजनक ठरली. अश्विनने १० षटकांत ७०, तर बुमराहने ९ षटकांत ६८ धावा बहाल केल्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळाले नाही. भारताला चौथ्या षटकात यश मिळाले होते. बुमराहच्या गोलंदाजीवर फखर झमानने धोनीच्या हातील झेल दिला, पण पंचानी नो-बॉलसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. रिप्लेमध्ये बुमराहचा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. झमान ३ धावांवर तंबूत परतणार होता, पण त्यानंतर त्याने १११ धावांची भर घातली. त्याच्या खेळीने समीकरण बदलले. पाकची कमकुवत भासणारी फलंदाजी मजबूत भासायला लागली. झमानला अझहरची योग्य साथ लाभली. भुवनेश्वरने एका टोकाकडून दडपण कायम राखले, पण बुमराहचा आत्मविश्वास ढासळला. त्याच्या स्थानी आठव्या षटकात अश्विनकडे चेंडू सोपविण्यात आला, पण त्यालाही प्रभाव दाखविता आला नाही. जडेजानेही निराश केले.दरम्यान, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अझहर धावबाद झाला आणि भारताला पहिले यश मिळाले. अझहरने ७१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १ षटकार लगावला. त्यानंतर जमानने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने जडेजाच्या एका षटकात दोन चौकार व एक षटकार वसूल केला तर त्यानंतर अश्विनच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. अश्विनच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका लगावत त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धेतील अंतिम लढतीत पाकिस्तानच्या फलंदाजाने झळकावलेले हे पहिले शतक ठरले. जमानला पांड्याने माघारी परतवले. शोएब मलिकाला (१२) मोठी खेळी करता आली नाही. कोहलीने या लढतीत गोलंदाजीमध्ये सातत्याने बदल केले. जडेजा अपयशी ठरल्यामुळे जाधवला गोलंदाजीसाठी पाचारण केले. जाधवने आजमला बाद केले. (वृत्तसंस्था)धावफलकपाकिस्तान : अझहर अली धावबाद ५९, फखर झमान झे. जडेजा गो. पांड्या ११४, बाबर आजम झे. युवराज गो. जाधव ४६, शोएब मलिक झे. जाधव गो. भुवनेश्वर १२, मोहम्मद हफीज नाबाद ५७, इमाद वसीम नाबाद २५. अवांतर (२५). एकूण ५० षटकांत ४ बाद ३३८. बाद क्रम : १-१२८, २-२००, ३-२४७, ४-२६७. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-२-४४-१, बुमराह ९-०-६८-०, अश्विन १०-०-७०-०, पांड्या १०-०-५३-१, जडेजा ८-०-६७-०, जाधव ३-०-२७-१. भारत : रोहित शर्मा पायचित गो. आमिर ००, शिखर धवन झे. सरफराज गो. आमिर २१, विराट कोहली झे. शादाब खान गो. आमिर ०५, युवराज सिंग पायचित गो. शादाब खान २२, महेंद्रसिंग धोनी झे. इमाद वसीम गो. अली ०४, केदार जाधव झे. सरफराज गो. शादाब खान ०९, हार्दिक पांड्या धावबाद ७६, रवींद्र जडेजा झे. बाबर गो. जुनेद १५, आर. अश्विन झे. सरफराज गो. हसन ०१, भुवनेश्वर कुमार नाबाद ०१, जसप्रीत बुमराह झे. सरफराज गो. अली ०१. अवांतर (३). एकूण ३०.३ षटकांत सर्वबाद १५८. बाद क्रम : १-०, २-६, ३-३३, ४-५४, ५-५४, ६-७२, ७-१५२, ८-१५६, ९-१५६, १०-१५८. गोलंदाजी : मोहम्मद आमिर ६-२-१६-३, जुनेद खान ६-१-२०-१, मोहम्मद हफीज १-०-१३-०, हसन अली ६.३-१-१९-३, शादाब खान ७-०-६०-२, इमाद वसीम ०.३-०-३-०, फखर झमान ३.३-०-२५-०.