ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ अखेर भारतात दाखल झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख बंदोबस्तात संघाचं स्वागत करण्यात आलं. पाकिस्तान संघ या वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही याबाबत साशंका व्यक्त केली जात होती. अखेर पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार हे नक्की झालं आहे. 19 मार्चला भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे.
सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तान संघाला भारतात पाठवण्यास पाकिस्तान सरकार नकार देत होते. शेवटी सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर हिमाचल प्रदेशमीधील धरमशाला येथून हा सामना कोलकात्यामधील इडन गार्डनवर हलवण्यात आला. मात्र तरीही पाकिस्तान सरकार सुरक्षेची हमी मागत होते. शेवटी पाकिस्तान सरकारने संघाला भारतात पाठवले असून शनिवारी रात्री पाकिस्तान संघ विमानतळावर पोहोचला.
WATCH: Pakistan cricket team arrives in Kolkata #WT20https://t.co/hpn2vCwwh3— ANI (@ANI_news) March 12, 2016
Pakistan cricket team arrives in Kolkata #WT20pic.twitter.com/NMbBpIeHSp— ANI (@ANI_news) March 12, 2016
Pakistan cricket team arrives in Kolkata #WT20pic.twitter.com/9saK2c2PWw— ANI (@ANI_news) March 12, 2016