कार्डिफ : पाकिस्तानने गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडला आठ गड्यांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दिलेले २११ धावांचे माफक आव्हान पाकिस्तानने ८ गडी आणि तब्बल ७७ चेंडू राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला जलदगती गोलंदाज हसन अली. त्यासोबतच अजहर अली आणि फखर झमन यांच्या शतकी भागिदारीमुळे पाकिस्तानने दमदार विजय मिळवला.कार्डिफ मैदानावर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडने पहिला गडी सलामीवीर अलेक्स हेल्सच्या रूपाने ३४ धावांवरच गमावला. त्याला पदार्पण करणाऱ्या रुम्मान रईस याने बाद केले. तर जेसन रॉयच्या जागी संधी मिळालेल्या जॉनी बेअरस्टो याने ४३ धावा केल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या बेअरस्टोला अनुभवी हसन अलीने मोहम्मद हाफीजकडे झेल देण्यास भाग पाडले. इंग्लंडचा मिस्टर डिपेंडेबल जो रुट याला ४६ धावांवर असताना शादाब खान याने बाद करत इंग्लंडला धक्का दिला. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या रुम्मान रईस याने अनुभवी गोलंदाज मोहम्मद आमीरची उणीव जाणवू दिली नाही. त्याने हेल्ससोबतच लियाम प्लंकेटलादेखील बाद केले. जुनैद खान यानेदेखील ४२ धावा देत दोन गडी बाद केले. तर हसन अली पाकिस्तानचा सर्वात लाभदायी गोलंदाज ठरला. त्याने ३५ धावात देत ३ गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्यानेच बेअरस्टो, कर्णधार मॉर्गन, बेन स्टोक्स यांना बाद केले. पाकिस्तानचे सलामीवीर अजहर अली आणि फखर झमन यांनी ११८ धावांची भागीदारी केली. झमन याने ८९ चेंडूत दमदार ५७ धावा केल्या. तर अजहर अली याने ७६ धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यावर पाकिस्तानच्या विजयाची औपचारिकता बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी पूर्ण केली. (वृत्तसंस्था)धावफलकइंग्लंड : जॉनी बेअरस्टो झे. मोहम्मद हाफीज गो. हसन अली ४३, अॅलेक्स हेल्स झे. बाबर आझम गो. रुम्मान रईस १३, जो रुट झे. सर्फराज अहमद गो. शादाब खान ४६, इयॉन मॉर्गन झे. सर्फराज अहमद, गो. हसन अली ३३, बेन स्टोक्स झे. मोहम्मद हाफीज गो. हसन अली ३४, जोश बटलर झे. सर्फराज अहमद गो. जुनैद खान ४, मोईन अली झे. फखर झमन गो. जुनैद खान ११, आदिल रशीद धावबाद अहमद शेहजाद ७, लियाम प्लंकेट झे. अजहर अली गो. रुम्मान रईस ९, मार्क वुड धावबाद सर्फराज अहमद ३, जॅक बॉल नाबाद २ अंवातर ६, एकूण धावसंख्या ४९.१ षटकांत सर्वबाद २११, गोलंदाजी : जुनैद खान ८.५- ०-४२-२, रुम्मान रईस ९-०-४४-२, इमाद वसीम ५-०-१६-०, शादाब खान ९-०-४०-१, हसन अली १०-०-३५- ३, मोहम्मद हाफीज ८-०-३३-०पाकिस्तान : अजहर अली गो. जॅक बॉल ७६, फखर झमन बटलर गो. राशिद ५७, बाबर आझम नाबाद ३८, मोहम्मद हाफीज ३१, अवांतर १३, एकूण ३७.१ षटकांत २ बाद २१५गोलंदाजी : मार्क वुड ८-१-३७-०, जॅक बॉल ८-०-३७-१, बेन स्टोंक्स ३-१-०-३८-०, लियाम प्लंकेट ६-०-३३-०, आदिल राशिद १०-०-५४-१, मोईन अली २-०-१५-०
पाकिस्तान अंतिम फेरीत
By admin | Published: June 15, 2017 4:07 AM