ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 1 - चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघ चार जून रोजी एकमेकांशी भिडणार आहेत. या "हायव्होल्टेज" सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज फिट नसल्याने या सामन्यात खेळू शकणार नाही. रविवारी सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार वहाब रियाजला झालेली दुखापत गंभीर आहे. पण याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. 31 वर्षीय वेगवान गोलंदाज रियाझला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे. मात्र तो खेळू शकणार की नाही यावर मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. पाकिस्तानचा संघ सध्या बर्मिंगहॅममध्ये दाखल झाला आहे. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आतापर्यंत तीन लढती झाल्या असून त्यापैकी दोन पाकने तर एक भारताने जिंकली आहे. त्यामुळे चार तारखेला बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या हायव्हॉल्टेज ड्रामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"हायव्होल्टेज" सामन्याआधी पाकिस्तानला झटका
By admin | Published: June 01, 2017 10:33 PM