भारतासोबत न खेळल्यास पाकिस्तान संपणार नाही : शहरयार
By admin | Published: September 09, 2015 1:42 AM
नवी दिल्ली : भारतासोबत गेल्या काही वर्षांत क्रिकेट न खेळूनही पाकिस्तान संपला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये यूएईत होणार्या मालिकेत भारत खेळला नाही; तरी पाकिस्तान संपणार नाही, असे वक्तव्य पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी केले आहे.
नवी दिल्ली : भारतासोबत गेल्या काही वर्षांत क्रिकेट न खेळूनही पाकिस्तान संपला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये यूएईत होणार्या मालिकेत भारत खेळला नाही; तरी पाकिस्तान संपणार नाही, असे वक्तव्य पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी केले आहे.बीसीसीआय व पीसीबी यांच्यात २०१५ ते २०२३ यादरम्यान ६ मालिका खेळण्याचा करार झाला आहे. मात्र, पीसीबीने बीसीसीआयला गेल्या अठवड्यात पाठवलेल्या पत्राचे उत्तर मिळाले नाही. या पत्रात बीसीसीआयला पीसीबीने कराराचा सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे.शहरयार खान म्हणाले, की हे भारत सरकारवर अवलंबून आहे. बीसीसीआयसोबत आम्ही करार केला आहे. त्यावर भारतीय बोर्डाने सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. आम्ही बीसीसीआयच्या मागे पळत नाही; मात्र आमचे एवढेच म्हणणे आहे, की त्यांनी कराराचा मान राखावा.पीसीबीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयला आग्रह केल्याने टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियाँदादनेही पीसीबीवर टीका केला आहे. आत्मसन्मान पणाला लावून भारतासोबत खेळू नये, असे मियाँदादने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)०००