पाकने मालिका जिंकली कसोटी : युनिस खानच्या नाबाद १७१ धावांच्या खेळीने विजय साकार पाल्लेकल : युनिस खानने झळकवलेल्या शानदार नाबाद १७१ धावांच्या बळावर पाकिस्तानने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात करीत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. श्रीलंकेकडे पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी होती. दुसर्या डावात श्रीलंकेने ३१३ धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज अहमद शेहझाद (०) दुसर्याच षटकात तंबूत परतला. पाठोपाठ अझहर अली (५) झटपट बाद झाल्याने पाकची अवस्था २ बाद १३ अशी बिकट झाली. त्यानंतर मात्र सलामवीर शान मसूद (१२५) व युनिस खानने (नाबाद १७१) फलंदाजीची सूत्रे हाती घेत श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार केला. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी २४२ धावांची भक्कम भागीदारी करीत संघाला विजयाच्या समीप नेले. संघाचा धावफलक २५५ वर असताना कौशलच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला. त्यानंतर मिसबाह उल हकने ५९ धावांची दमदार खेळी करीत युनिसला मोलाची साथ देत ३८२ धावा करीत विजयी लक्ष्य पूर्ण केले. प्रसाद, लकमल व कौशल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव : ८९.५ षटकांत सर्व बाद २७८ धावा, करुणारत्ने १३० यष्टिचीत सर्फराज अहमद हो. अझर अली, थरंगा ४६ झे. युनिस खान गो. यासिर शाह, जे. मुबारक २५ यष्टिचीत गो. यासीर शाह, चंदीमल २४ पायचीत गो. राहत अली, पाकिस्तान पहिला डाव : ६६ षटकांत सर्व बाद २१५, अहमद शेहझाद २१ झे. चंदीमल गो. प्रदीप, अझहर अली ५२ झे. करुणारत्ने गो. प्रदीप, सर्फराज अहमद नाबाद ७८, यासिर शाह १८ झे. चंदीमल गो. प्रसाद, श्रीलंका दुसरा डाव : ९५.४ षटकांत सर्व बाद ३१३, थरंगा ४८ झे. अझहर अली गो. यासिर शाह, मॅथ्यूज १२२ झे. सर्फराज अहमद गो. इम्रान खान, जे. मुबारक ३५ झे. असगर अली गो. यासिर शाह, चंदीमल ६७ पायचीत गो. इम्रान खान, पाकिस्तान दुसरा डाव : १०३.१ षटकांत ३ बाद ३८२, शान मसूद १२५ यष्टिचीत गो. कौशल, युनिस खान नाबाद १७१, मिस्बाह उल हक नाबाद ५९पाकिस्तान कसोटी क्रमवारीत तिसर्या स्थानावर श्रीलंकेविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे पाकिस्तानने कसोटी क्रमवारीत भारत व न्यूझीलंडला मागे टाकत तिसर्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. पराजयामुळे श्रीलंकेला ५ गुणांचा फटका बसला असला तरी ते सातव्या स्थानावर कायम आहेत. पहिल्या दोन क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. ------------
पाकने मालिका जिंकली
By admin | Published: July 07, 2015 10:55 PM