शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पाकने मालिका जिंकली

By admin | Published: July 07, 2015 10:56 PM

पाकने मालिका जिंकली

पाकने मालिका जिंकली
कसोटी : युनिस खानच्या नाबाद १७१ धावांच्या खेळीने विजय साकार
पाल्लेकल : युनिस खानने झळकवलेल्या शानदार नाबाद १७१ धावांच्या बळावर पाकिस्तानने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात करीत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.
श्रीलंकेकडे पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी होती. दुसर्‍या डावात श्रीलंकेने ३१३ धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज अहमद शेहझाद (०) दुसर्‍याच षटकात तंबूत परतला. पाठोपाठ अझहर अली (५) झटपट बाद झाल्याने पाकची अवस्था २ बाद १३ अशी बिकट झाली. त्यानंतर मात्र सलामवीर शान मसूद (१२५) व युनिस खानने (नाबाद १७१) फलंदाजीची सूत्रे हाती घेत श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार केला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी २४२ धावांची भक्कम भागीदारी करीत संघाला विजयाच्या समीप नेले. संघाचा धावफलक २५५ वर असताना कौशलच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला. त्यानंतर मिसबाह उल हकने ५९ धावांची दमदार खेळी करीत युनिसला मोलाची साथ देत ३८२ धावा करीत विजयी लक्ष्य पूर्ण केले. प्रसाद, लकमल व कौशल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव : ८९.५ षटकांत सर्व बाद २७८ धावा, करुणारत्ने १३० यष्टिचीत सर्फराज अहमद हो. अझर अली, थरंगा ४६ झे. युनिस खान गो. यासिर शाह, जे. मुबारक २५ यष्टिचीत गो. यासीर शाह, चंदीमल २४ पायचीत गो. राहत अली, पाकिस्तान पहिला डाव : ६६ षटकांत सर्व बाद २१५, अहमद शेहझाद २१ झे. चंदीमल गो. प्रदीप, अझहर अली ५२ झे. करुणारत्ने गो. प्रदीप, सर्फराज अहमद नाबाद ७८, यासिर शाह १८ झे. चंदीमल गो. प्रसाद, श्रीलंका दुसरा डाव : ९५.४ षटकांत सर्व बाद ३१३, थरंगा ४८ झे. अझहर अली गो. यासिर शाह, मॅथ्यूज १२२ झे. सर्फराज अहमद गो. इम्रान खान, जे. मुबारक ३५ झे. असगर अली गो. यासिर शाह, चंदीमल ६७ पायचीत गो. इम्रान खान, पाकिस्तान दुसरा डाव : १०३.१ षटकांत ३ बाद ३८२, शान मसूद १२५ यष्टिचीत गो. कौशल, युनिस खान नाबाद १७१, मिस्बाह उल हक नाबाद ५९

चौकट
पाकिस्तान कसोटी क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर
श्रीलंकेविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे पाकिस्तानने कसोटी क्रमवारीत भारत व न्यूझीलंडला मागे टाकत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. पराजयामुळे श्रीलंकेला ५ गुणांचा फटका बसला असला तरी ते सातव्या स्थानावर कायम आहेत. पहिल्या दोन क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत.
------------