शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

Sania Mirza, Pakistan Tennis Shoaib Malik: 'सानिया भाभीला सांगा, आमच्या संघाला कोचिंग दे'; पाकिस्तानच्या खेळाडूची थेट शोएब मलिकला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 5:44 PM

सानियाने कोचिंग दिल्यास संघ अधिक चांगला खेळेल, असा व्यक्त केला विश्वास

Sania Mirza, Pakistan Tennis Shoaib Malik: पाकिस्तानची महिला टेनिस स्टार मेहक खोखर (Meheq Khokhar) सध्या चर्चेत आहे. मेहकने भारतीय महिला टेनिसपटूसानिया मिर्झा हिला पाकिस्तानात येऊन पाकिस्तानी महिला टेनिस संघाचे प्रशिक्षक बनण्याचे आवाहन केले आहे. सानियाने प्रशिक्षण दिले तर पाकिस्तानचा महिला टेनिस संघ अधिक चांगली कामगिरी करू शकेल, असे तिने म्हटले आहे. तसेच, मेहकने यासाठी शोएब मलिकचीही मदत घेतली आहे.

मेहक खोखरने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, लवकरच पाकिस्तान फेडरेशन कपसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार आहेत. सानिया मिर्झा सतत पाकिस्तानात येत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत सानियाने पाकिस्तानच्या महिला टेनिस संघाला मार्गदर्शन व प्रशिक्षण द्यावे. मेहकने तिच्या व्हिडीओमध्ये असेही म्हटले की, मी यासाठी शोएब मलिक यांची मदत घेईन. पाकिस्तान टेनिस संघाला प्रशिक्षण देण्याची गळ शोएब मलिकने पत्नी सानियाला घालावी अशी विनंती मी त्यांना करेन. कारण तसे झाल्यास त्याचा पाकिस्तानी टेनिस संघाला (आम्हाला) खूप फायदा होईल.

मेहक खोखरबद्दल सांगायचे तर, सध्या तिची गणना पाकिस्तानच्या अव्वल टेनिसपटूंमध्ये केली जाते. सानिया मिर्झासारख्या ग्लॅमरस अवतारासाठीही मेहक ओळखली जाते. ती अनेक टीव्ही शोमध्येही दिसली आहे. सानिया मिर्झा ही पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी आहे, त्यामुळे ती अनेकदा पाकिस्तानात जात असते. काही काळापूर्वी सानिया मिर्झाने पाकिस्तानमध्ये बरेच दिवस होती. तिथे ती अनेक टीव्ही शो आणि इतर कार्यक्रमांनाही गेली होती.

 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकTennisटेनिसPakistanपाकिस्तान