कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्राला तिसरा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन फुटबॉलपटू अब्दुलकादीर मोहमेद फराह याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. आफ्रिकन फुटबॉल महासंघ आणि सोमाई फुटबॉल महासंघानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नॉर्थवेस्ट लंडन हॉस्पिटल मध्ये 59 वर्षीय फराहला प्राण गमवावे लागले. तत्पूर्वी, स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आता पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला कोरोना व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले.
पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॉशपटून आझम खान यांचा कोरोना व्हायरसमुळे लंडन येथे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. आझम यांनी 1959 आणि 1961 मध्ये ब्रिटिश ओपन स्पर्धा जिंकली होती. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी त्यांनी लंडन येथील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. 1962मध्ये आझम यांच्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाले आणि त्यामुळे त्यांनी स्क्वॉश खेळणं सोडलं. पाकिस्तानातील पेशावर येथील नवकिल्ले येथे त्यांचा जन्म झाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात?
विराट-अनुष्कानं नक्की किती रुपयांची केली मदत? आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क