शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी

By admin | Published: October 27, 2014 1:59 AM

पाकिस्तानने आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी ४३८ धावांचे कठीण आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१.१ षटकांत २१६ धावांत संपुष्टात आला

दुबई : डावखुरा फिरकीपटू जुल्फिकार बाबरची (५-७४) कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी व पदार्पणाची लढत खेळणाऱ्या लेगस्पिनर यासिर शाहचा (४-५०) अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने आज, रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा २२१ धावांनी पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.पाकिस्तानने आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी ४३८ धावांचे कठीण आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१.१ षटकांत २१६ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज चहापानानंतर संपला. बाबरने ३१.१ षटकांत ७४ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले. शाह याने २५ षटकांत ५० धावांच्या मोबदल्यात चार बळी घेत त्याला योग्य साथ दिली. धावांचा विचार करता पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा मोठा विजय ठरला. यापूर्वी पाकिस्तानने नोव्हेंबर १९९५ मध्ये आॅस्ट्रेलियाचा सिडनी येथे ७४ धावांनी पराभव केला होता. बाबरने आॅस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज पीटर सिडलला बाद केल्यानंतर पाक संघातील सर्व सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला. दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा अनुभवी फलंदाज युनूस खान व पदार्पणात संस्मरणीय कामगिरी करणारा यासिर यांनी स्टंप हातात घेत आनंद साजरा केला. पाकला हा विजय साकारण्यासाठी संघर्ष करावा लागला. काल, शनिवारच्या ४ बाद ५९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाची उपाहारापर्यंत ७ बाद ११७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने संघर्षपूर्ण खेळ करीत पाकिस्तानला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी आॅस्ट्रेलियाची ८ बाद १९६ अशी स्थिती होती. चहापानानंतर शाहने जॉन्सनला माघारी परतविले, तर बाबरने सिडलला बाद करीत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जॉन्सनने १२७ चेंडूंना सामोरे जाताना ६१ धावा फटकाविल्या. त्यात सहा चौकार व एका षट्काराचा समावेश आहे. सिडलने ६६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना १५ धावा फटकाविल्या. स्टिव्हन स्मिथने संघर्षपूर्ण खेळी करताना अर्धशतक झळकाविले. त्याने १७५ चेंडूंमध्ये ५५ धावा फटकाविल्या. त्यात तीन चौकारांचा समावेश आहे. दोन्ही डावांत (अनुक्रमे १०६ व नाबाद १०३) शतकी खेळी करणारा युनूस खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बाबरने या लढतीत एकूण सात, तर शाहनेही पदार्पणाच्या कसोटीत सात बळी घेतले. (वृत्तसंस्था)