शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

पाकिस्तानचा पुन्हा धुव्वा

By admin | Published: June 25, 2017 12:09 AM

हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश आले असले तरी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध आपली जबरदस्त कामगिरी पुढे सुरू ठेवली

लंडन : हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश आले असले तरी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध आपली जबरदस्त कामगिरी पुढे सुरू ठेवली असून शनिवारी येथे झालेल्या सामन्यात त्यांनी पाकचा ६-१ असा धुव्वा उडवला.भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात पाकला ७-१ ने हरवले होते, तर आज ६-१ गोलने विजय मिळवला. भारताकडून रमणदीपसिंग आणि मनदीपसिंग यांनी प्रत्येकी दोन हरमनप्रीत आणि तलविंदरसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. एजाज अहमदने पाकिस्तानकडून एकमेव गोल केला.सामन्याचा पहिला क्वार्टर भारताच्या नावावर राहिला. भारतीय खेळाडू पाकिस्तानी क्षेत्रातच जास्तवेळ दिसत होते. रमणदीपने आठव्या मिनिटाला रिव्हर्स प्लिकवर पाकिस्तानी गोलरक्षकाला चकवत पहिला गोल नोंदवला. त्यानंतर चार मिनिटांनी ही गोलसंख्या दुप्पट करण्याची आकाशदीपला संधी होती, परंतु तो अयशस्वी ठरला. भारताला २-० ने आघाडी मिळवून देण्यास तलविंदरसिंगने कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही. प्रदीप मोरच्या क्रॉसला त्याने डिफ्लेकट करीत गोल डागला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला गोल करण्याची चांगली संधी होती, परंतु भारतीय बचाव फळीने ती हाणून पाडली. २७ व्या मिनिटाला मनदीपसिंगने आपला पहिला गोल नोंदवला. त्यापाठोपाठ दुसऱ्याच मिनिटाला रमणदीपने गोल नोंदवला. या क्वार्टरमध्ये भारताने तीन गोल नोंदवून ४-० अशी भक्कम आघाडी घेत पाकिस्तानकडून मध्यंतरालाच सामना हिसकावून घेतला होता.३६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने शॉर्ट कॉर्नरवरून गोल नोंदवत भारताची आघाडी ५-० अशी केली. याच तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकच्या एजाजने भारतीय बचावफळीतील गोंधळाचा फायदा घेत गोल नोंदवून पाकिस्तानचे खाते उघडले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. यात मनदीपने रिबाउंडवर गोल नोंदवून भारताला ६-१ असा सोपा विजय मिळवून दिला. या पराभवामुळे पुढील वर्षी भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची पाकिस्तानची अपेक्षाही भंग पावली.