शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाकिस्तानचा द. आफ्रिकेवर विजय

By admin | Published: June 08, 2017 1:26 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने करा अथवा मराच्या लढतीत आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार19 धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमतबर्मिंघम, दि. 8 : चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने करा अथवा मराच्या लढतीत आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार19 धावांनी पराभव केला. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा सामनाही रद्द होणार असे वाटत होते. पण पाक फलंदाजांनी सुरुवातीपासूनच योग्य ती धावगती राखल्यामुळ्ये त्यांना विजयी घोषित केले. पहिल्या सामन्यात सुमार गोलंदाजी करणाऱ्या पाक संघाने दुसऱ्या सामन्यात दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. त्यांनी द. आफ्रिकेला 50 षटकांत 8 बाद 219 धावांवर रोखले. 75 धावांवर नाबाद राहिलेल्या डेव्हिड मिलरने एकाकी झुंज देत आफ्रिकेचा डाव सांभाळला.220 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने पावसाचा व्यत्यय येईपर्यंत पाकिस्तान संघाने 27 षटकांत तीन बाद 119 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 27 षटकांत 100 धावा करायच्या होत्या. पाकिस्तान संघाच्या 19 धावा जास्त आसल्यामुळे त्यांना 19 धावांनी विजयी घोषित केले. त्यापूर्वी, बर्मिंघममध्ये द.अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर हशीम आमला आणि क्विंटन डी कॉक यांनी 40 धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज आफ्रिकेला चांगली धावसंख्या उभी करून देतील असे वाटत असतानाच इमाद वसीम याने आमलाला पायचीत पकडले. त्यानंतर 14 व्या षटकांत क्विंटन डी कॉकलाही मोहम्मद हाफीज याने तंबूत परत पाठवले. डी कॉक याने 49 चेंडूत 33 धावा केल्या. धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स याला इमाद वसीम याने पहिल्याच चेंडूवर खातेही उघडू न देता बाद केले. फाफ डु प्लेसीस याने 26 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 104 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली याने ३ गडी बाद केले, तर जुनैद खान व इमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.