शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

Palghar Mob Lynching: बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, कल्पनाही करवत नाही; ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्तची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:12 PM

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने गुरुवारी रात्री तिघांची हत्या केल्याची घटना घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते. या घटनेचा देशभरात तीव्र निषेध केला जात आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. त्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू योगेश्वर दत्त यानेही या घटनेचा निषेध केला. पण, यावेळी त्यानं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली.

गेल्या आठवड्यात झालेल्या या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले.

2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू आणि आता भाजपाचा नेता असलेल्या योगेश्वर दत्तनं या घटनेचा निषेध केला. तो म्हणाला,''महाराष्ट्राच्यापालघर जिल्ह्यात पोलिसांच्या समक्ष दोन वृद्ध संतांची निर्घृण हत्या झाली. बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, याची कल्पनाही करवत नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो

संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्रpalgharपालघरCrime Newsगुन्हेगारी