खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:22 IST2023-02-03T19:21:40+5:302023-02-03T19:22:57+5:30
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी मारली.

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी
(हितेन नाईक)
पालघर : भोपाळ येथे सुरु झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघर जिल्ह्यातील ईशा जाधव हिने अत्यंत चुरशीच्या शर्यतीत यजमान मध्यप्रदेशच्या स्पर्धकांवर मात करीत सुवर्ण पदक पटकाविले. मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये आयोजित 400 धावणे 18 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र राज्याला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
या स्पर्धेत यजमान मध्यप्रदेशची शिवकन्या मुक्ती व रोशनी यादव यांचे आव्हान होते. त्यात ईशाने आपली चुणूक दाखवून अंतिम रेषा पार केली. यात शिवकन्या व रोशनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आली.