शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

अडवाणी-मेहरा यांनी पटकावले जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:05 PM

पंकजने आपल्या कारकिर्दीतील एकूण २३व्यांदा, तर आदित्यने पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद पटकावले.

मंडाले: भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकानुसार दमदार खेळ करत आदित्य मेहतासह आयबीएसएफ जागतिक अजिंक्यपद सांघिक स्नूकरचे जेतेपद उंचावले. बुधवारी रात्री झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंकज-आदित्य यांनी थायलंड संघाला ५-२ असे पराभूत केले. विशेष म्हणजे पंकजने आपल्या कारकिर्दीतील एकूण २३व्यांदा, तर आदित्यने पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद पटकावले.अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने पहिली फेरी ६५-३१ अशी जिंकत सकारात्मक सुरुवात केली. यानंतर पंकजला ९-६९ पराभवाचा धक्का बसला, मात्र आदित्यने ५५ गुण मिळवत भारताला पुनरागमन करुन दिले. भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतल्यानंतर सलग दोन फ्रेम जिंकत बाजी मारली. आधी पंकजने ५२ ब्रेक  गुण मिळवल्यानंतर अखेरच्या फ्रेममध्ये आदित्यने ८३-९ असे वर्चस्व राखत भारताच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘कारकिर्दीतील पहिले विश्वविजेतेपद रोमांचकारी आहे. इतक्या वर्षांच्या कठोर मेहनतीचे फळ आज मिळाले,’ अशी प्रतिक्रिया आदित्यने दिली. तसेच, पंकज म्हणाला की, ‘हा दौरा माझ्यासाठी स्वप्नवत ठरला. म्यानमार येथे तीन आठवड्यांपेक्षा कमी कलावधीमध्ये मी जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य जिंकले. माझ्या संग्रहामध्ये केवळ याच स्पर्धेचे जागतिक जेतेपद नव्हते, पण आता हे जेतेपद पटकावल्याने माझ्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे.’

टॅग्स :Snooker Gameस्नूकरIndiaभारतThailandथायलंड