बँकॉक : भारताचा अव्वल स्नूकर खेळाडू पंकज अडवाणीने प्रतिष्ठेच्या ६ रेड स्नूकर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक पटकावणारा पहिला भारतीय असा मान यावेळी अडवाणीने मिळवला. उपांत्य फेरीत चीनच्या डिंग जुनहुईविरुध्द पराभूत झाल्यानंतर अडवाणीने कांस्य निश्चित केले.उपांत्यपुर्व फेरीमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू मायकल होल्टने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने अडवाणीला पुढील फेरीसाठी चाल मिळाली होती. मात्र, उपांत्य फेरीत अडवाणीची घोडदौड रोखली गेली. जुनहुई याने अटीतटीच्या या लढतीत ०-३७, ६८-०, ७३-०, ४१-२६, ४९-१५, ७-५७, ०-५७, ६७-०, ५७-०, २०-३४, ६९-९ असा धक्का दिला. या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक मिळवणे हे सिध्द करते की कामगिरी चांगली झाली आहे. या स्पर्धेसाठी मी बाहेरील खेळाडू होतो आणि तरीही इतकी मोठी मजल मारणे खूप चांगली बाब आहे. -पंकज अडवाणी
पंकज अडवाणीला कांस्यपदक
By admin | Published: September 10, 2016 3:51 AM