शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पंतने मने जिंकली

By admin | Published: May 05, 2017 3:20 AM

कर्णधार करुण नायर बाद झाल्यावर दिल्लीकर दडपणाखाली आले. मात्र युवा ऋषभ पंतने तुफानी फटकेबाजी केली आणि

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमतनवी दिल्ली दि. 5 -  रैना, कार्तिक सारख्या दिग्गजांचा शो संपला, दोघांनी तुफानी खेळी करत गुजरात लायन्सला २०८ ही टी २० तील डोंगराएवढी धावसंख्या उभारून दिली. आता दिल्लीच्या नवख्या खेळाडूंचे त्यांच्यासमोर पानिपत होणार अशी स्थिती होती. त्यातच कर्णधार करुण नायर बाद झाल्यावर दिल्लीकर दडपणाखाली आले. मात्र युवा ऋषभ पंतने तुफानी फटकेबाजी केली आणि ही धावसंख्याही छोटी करून दाखवली. दिल्लीने आतापर्यंत पाठलाग करून विजय मिळवलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. क्रिकेट विश्वात ऋषभ पंतची तुलना धोनीसोबत केली जाते ते उगाचच नाही हे त्याने आजच्या खेळीने दाखवून दिले. शतक पूर्ण करण्यास फक्त तीन धावा शिल्लक असताना तो बाद झाला. बसील थम्पीने त्याला बाद केले. मात्र तो बाद झाल्यावर लायन्सचा कर्णधार सुुरेश रैना याने थम्पीचे अभिनंदन करण्याऐवजी आधी पंतचे कौतुक केले. त्यातच त्याची आजची खेळी किती मोठी हे दिसून येते. पंतच्या या खेळीने रैना, कार्तिक यांच्या तुफानी खेळींचे महत्त्व आपोआपच कमी केले.गुजरातच्या गोलंदाजीचा विचार केला तर ही गोलंदाजी अगदीच सुमार दर्जाची नाही. त्यांच्याकडे रविंद्र जाडेजा, जेम्स फॉकनर यांच्यासारखे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. मात्र त्यांच्या गोलंदाजीचा समाचार त्याने घेतला. त्याने फॉकनरला तीन आणि जाडेजाला एक षटकार लगावला. या सामन्यात पंतने तब्बल ९ षटकार लगावले. त्यासोबतच तो सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्याखेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याने १० सामन्यात १७ षटकार लगावले आहेत. त्यासोबतच पंतची समर्थ साथ संजू सॅमसन याने दिली. पंतसोबतच दुसऱ्या बाजुने त्याने जोशात आक्रमण केले. चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्याने ३१चेंडूतच ६७ धावा केल्या. त्याने देखील रैना, जाडेजा, फॉकनर , संगवान यांची धुलाई केली. या सामन्यात क्षेत्ररक्षकांपेक्षा जास्त वेळा चेंडू स्टॅण्डमधील प्रेक्षकांच्याच हाती पोहचला.गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याने या सामन्यात जाडेजाला दहाव्या षटकानंतर गोलंदाजी देण्याचा निर्णय का घेतला हे कोड्यात टाकणारे आहे. समोरुन तुफानी आक्रमण होत असताना रैनाने जागतीक क्रमावारीत अव्वल स्थानांवर असणाऱ्या जाडेजाला गोलंदाजी देण्याएवजी पार्टटाईम गोलंदाज असून स्वत: दोन षटके टाकली. त्या षटकांत त्याने २४ धावा दिल्या. त्याचा मोठा फटकागुजरातला बसला. दोन्ही फलंदाजांनी चांगलाच जम बसवल्यावर त्याने गोलंदाजीसाठी जाडेजाला पाचारण केले. जाडेजानेही त्याला निराश केले नाही. त्याने सॅमसनला तंबूत परत पाठवले. मात्र तो पर्यंत उशीर झाला. दिल्लीने धावफलकावर १६७चा आकडा गाठला होता. बसील थम्पीने पंतला बाद केले. कोरी अँडरसन आणि श्रेयस अय्यर यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.दिल्लीच्या संजू आणि ऋषभ या दोन्ही खेळाडूंनी अव्वल दहात स्थान मिळवले. संजू सॅमसने आॅरेंज कॅपच्या शर्यतीत पाचवे स्थान गाठले आहे. त्याने १० सामन्यात ३७४ धावा केल्या. तर ऋषभने १० सामन्यात २० षटकार ठोकले. या यादीत त्याने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याच्या पुढे फक्त उथप्पा (२१) आणि डेव्हिड वॉर्नर(२३) हे आहेत.या सामन्यातील विजयासोबतच दिल्लीने आपल्या प्ले आॅफच्या आशा कायम राखल्या आहेत. दहा सामन्यात चार विजयांसह दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. प्ले आॅफसाठी त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकणे गरजेचे ठरणार आहे. त्यासोबतच आपला नेट रनरेटही वाढवावा लागेल.