पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरू होणार आहे. भारताचा ५४ सदस्यांचा पथक टोक्योत दाखल झाला असून उद्घाटन सोहळ्यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू ध्वजधारक म्हणून दिसणार होता. पण, उंच उडीपटू थंगवेलू याला क्वारंटाईन व्हावे लागले आहे. थंगवेलू ज्या विमानातून टोक्योत दाखल झाला, त्यातील प्रवासी कोरोनाग्रस्त आढळला. त्यामुळे टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात जपानी व्हॉलेंटियरच्या हाती भारताचा तिरंगा दिसणार आहे. ( A Japanese volunteer is likely to carry the Indian national flag at the opening ceremony of the Tokyo 2020 Paralympics)
मराठी माणसानं जिंकलेलं पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिलं पदक; जाणून घेऊया १२ पदकांचा गौरवशाली इतिहास!
थंगवेलू हा जपान नॅशनल स्टेडियमवर ध्वजधारक असेल अशी घोषणा भारतीय पॅरालिम्पिक समितीनं दिली होती. २०१९च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत स्थान पटकावले होते. पण, आता उद्घाटन सोहळ्यात थंगवेलू ध्वजधारकाच्या भूमिकेत दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजल्यापासून हा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. थंगवेलू या स्पर्धेत उंच उडी F42 क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहे. याच प्रकारात त्यानं २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत १.८९ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकले होते. त्याला खेल रत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ( 6 members of the Indian contingent at Paralympic including flag bearer Mariyappan Thangavelu identified as close contact of a COVID positive person and won't be able to participate in the opening ceremony.)
उद्घाटन सोहळ्यात भारताचे पाच खेळाडू व सहा अधिकारी सहभागी होणार होते. थंगवेलूसह थाळीफेकपटू विनोद कुमार, भालाफेकपटू टेक चंद आणि पॉवलिफ्टर जयदीप व सकिना खातून यांचा समावेश होता.