Paris Olympic 2024 Day 5 India Schedule ( Marathi News ) : गेल्या पाच दिवसापासून पॅरिस ऑलिम्पिक सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली आहे, काल मनू भाकरने शुटिंगमध्ये ब्रॉन्ज पदक मिळवले. मनू भाकरने एकेरीच्या सामन्यात पहिला क्रमांक मिळाला. त्यानंतर चौथ्या दिवशी तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत मोठी कामगिरी केली.
ऑलिम्पिकमधील आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंचा पदकासाठी कोणताही सामना होणार नाही. वेळापत्रकानुसार आजच्या दिवशी पदकासाठी एकही सामना होणार नसल्याचे दिले आहे. आज फक्त नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि घोडेस्वारी या गटातील किंवा पात्रता सामने होणार आहेत.
दुहेरी पदकाचा ‘मनू’स्वी आनंद; मनू भाकर-सरबजित जोडीला पिस्टल मिक्स्डमध्ये कांस्यपदक
पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक
नेमबाजी
५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष क्वालिफिकेशन : ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर आणि स्वप्नील कुसाळे - दुपारी १२:३०
ट्रॅप महिला क्वालिफिकेशन : श्रेयसी सिंह आणि राजेश्वरी कुमारी - दुपारी १२.३०
बॅडमिंटन
महिला एकेरी (ग्रुप स्टेज) : पीव्ही सिंधू वि. (एस्टोनिया) - दुपारी १२:५०
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध जोनाथन क्रिस्टी (इंडोनेशिया) - १.४०
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): एचएस प्रणॉय विरुद्ध डुक फाट ले (व्हिएतनाम) - रात्री ११ वा.
टेबल टेनिस
महिला एकेरी (अंतिम ३२ फेरी): श्रीजा अकुला वि जियान जेंग (सिंगापूर) - दुपारी २:२०
मुष्टियुद्ध: महिला ७५ किलो (शेवटची १६ फेरी): लोव्हलिना बोरगोहेन वि. सुनिव्वा हॉफस्टेड (नॉर्वे) - दुपारी ३:५० (पुरुष ३:५०) अंतिम १६ फेरी): निशांत देव विरुद्ध जोस गॅब्रिएल रॉड्रिग्ज टेनोरियो (इक्वाडोर) - दुपारी १२:१८.
तिरंदाजी
महिला एकेरी: शेवटचा ६४ टप्पा: दीपिका कुमारी - दुपारी ३.५६
पुरुष एकेरी: अंतिम ६४ वा टप्पा: तरुणदीप राय - सायंकाळी ९.१५
घोडेस्वारी
वैयक्तिक ड्रेसेज ग्रँड प्रिक्स दिवस २: अनुष अग्रवाला - दुपारी १.३० वाजता