Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिकचा आज सहावा दिवस आहे. गेल्या पाच दिवसात भारताने दोन पदके मिळवली आहे. दोन्ही पदके मनू भाकरने मिळवली. आता आज पुन्हा एकदा भारताला पदक मिळू शकते. आज दुपारी १ वाजता, स्वप्नील कुसळे पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात नेमबाजीत अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्याला देशासाठी तिसरे पदक मिळवून देण्याची संधी आहे.
कालही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारताला पहिलं आणि दुसर पदक नेमबाजीमध्ये मनू भाकरने आणली आहेत. तिने नेमबाजीत कास्यपदक जिंकलं आहे. दरम्यान, आजही भारतीय खेळाडू खेळणार आहेत.
Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम
जाणून घ्या आजचे वेळापत्रक
गोल्फ
पुरुष वैयक्तिक अंतिम: गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा - दुपारी १२.३० वा.
नेमबाजी
पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स (अंतिम) : स्वप्नील कुसाळे - दुपारी १.०० वाजता
महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स (पात्रता): सिफ्त कौर सामरा आणि अंजुम मौदगिल - दुपारी ३.३०.
हॉकी
भारत विरुद्ध बेल्जियम (ग्रुप स्टेज मॅच): दुपारी १.३० वा.
बॉक्सिंग
महिला फ्लायवेट (उपांत्यपूर्व फेरी): निकहत जरीन विरुद्ध यू वू (चीन) - दुपारी २.३० वा.
तिरंदाजी
पुरुष वैयक्तिक (१/३२ एलिमिनेशन): प्रवीण जाधव विरुद्ध काओ वेन्चाओ (चीन) - दुपारी २.३१ पुरुष वैयक्तिक (१/१६ एलिमिनेशन): दुपारी ३.१०.
टेबल टेनिस
महिला एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): दुपारी १.३० वा.
नौकायन-
पुरुषांची डिंगी शर्यत एक: विष्णू सरवणन: दुपारी ३.४५ वाजता
पुरुषांची डिंगी शर्यत २: विष्णू सरवण: शर्यत १ नंतर
महिलांची डिंगी शर्यत एक: नेत्रा कुमानन: ७.०५ वाजता महिलांची डिंगी शर्यत दोन: नेत्रा कुमानन