Paris Olympic 2024 Lates News : भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी खेळाडू म्हणून मनू भाकरच्या नावाची नोंद झाली आहे. तिने शूटींगमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. विशेष बाब म्हणजे या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. (manu bhaker wins medal)
पदक जिंकताच सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनू भाकरला मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश आले नव्हते. तिचे पिस्तूल खराब झाल्याने तिच्या पदरी निराशा पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले. याशिवाय मोदींनी फोनद्वारे मिनूशी संपर्क साधून तिचे अभिनंदन करताना तेथील सुविधांबद्दल विचारपूस केली.
मोदींनी फोन करून मनू भाकरचे अभिनंदन. ते म्हणाले की, तुझ्या यशाची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला आहे. आपल्या देशाचे नाव मोठे करत आहेस. तू या क्षेत्रात पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू असल्याने तुझे खूप कौतुक होत आहे. पुढे देखील तू असेच यश संपादन करशील असा मला विश्वास आहे. इतर सहकारी खेळाडू सगळेजण ठीक आहेत ना? तिथे आपल्या खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. घरच्यांसोबत चर्चा झाली आहे का? तुझ्या वडिलांना खूप आनंद झाला असेल.
२२ वर्षीय मुलीची कमालपिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.