शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:39 PM

India vs New Zealand Hockey : भारताच्या पुरूष संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. 

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ९ वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली. भारतीय संघासाठी पहिला क्वार्टर काही खास राहिला नाही. प्रतिस्पर्धी न्यूझीलंडने ०-१ ने आघाडी घेत पकड मजबूत केली होती. मग भारतीय खेळाडू काहीसे खचल्याचे दिसले. पण, हार न मानता जोरदार पुनरागमन करत भारतीय शिलेदारांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंवर दबाव टाकला. याचाच फायदा टीम इंडियाला पहिला गोल करताना झाला. टीम इंडियाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये शानदार कामगिरी करत एक गोल केला. मंदीप सिंगने केलेल्या गोलमुळे हाफ टाइमपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. (ind vs nz hockey) 

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच अर्थात तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने एक गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. सलग चार पेनल्टी कॉर्नरमध्ये भारताने बचाव केल्याने न्यूझीलंडवरचा दबाब वाढतच राहिला. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडचे खेळाडू संघर्ष करत राहिले पण त्यांना गोल करता आला नाही. अनेकदा न्यूझीलंडचे खेळाडू गोल करण्याच्या इराद्याने एकवटले पण त्यांच्यासमोर भारतीय गोलरक्षक काळ बनून उभा राहिला. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताने आपली आघाडी कायम ठेवली होती. (Paris Olympic 2024)

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला न्यूझीलंडने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने मारा केला असता न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने चांगली कामगिरी केली. खेळ संथ गतीने सुरू असताना न्यूझीलंडच्या सायमन चाइल्डने (आंतरराष्ट्रीय १४७ वा गोल) आठव्या मिनिटाला महत्त्वाचा गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. विशेष बाब म्हणजे सामन्यातील अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना भारताकडून हरमनप्रीत सिंगने मॅचविनिंग गोल करून ३-२ अशी आघाडी घेतली. एकूणच टीम इंडियाने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला आणि विजय साकारला. भारताने ३-२ अशा फरकाने सामना आपल्या नावावर केला. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndia VS New Zealandभारत विरुद्ध न्यूझीलंड