शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'गोल्डन बॉय' सोनेरी कामगिरी करणार? आज थरार; पाकिस्तानचं आव्हान, नीरजनं सांगितलं प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 2:05 PM

Paris Olympic 2024 updates in marathi : नीरज चोप्रा आज सुवर्ण पदकासाठी भिडणार आहे. 

neeraj chopra match olympic 2024 : भारताचा गोल्डन बॉय, तमाम भारतीयांच्या आशेचा किरण, सुवर्ण पदकविजेता नीरज चोप्रा आज पदकासाठी मैदानात असेल. (neeraj chopra match olympic 2024) टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले. (neeraj chopra match Olympic news) मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे तो आता सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घालतो का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. (neeraj chopra match time) 

भारतीय ॲथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी आज मैदानात उतरेल. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी नीरजच्या सामन्याला सुरुवात होईल. नीरजचा पदकाचा सामना स्पोर्ट्स १८ आणि जियो सिनेमावर लाईव्ह पाहता येईल. 

पदकाचा सामना खेळण्यापूर्वी नीरजने एक सूचक विधान केले. त्याने सांगितले की, फायनल खूप जबरदस्त होईल यात शंका नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलपेक्षा यावेळी पात्रता फेरीतच चांगला थ्रो टाकू शकलो. अंतिम फेरीत खूप स्पर्धा असेल हे नक्की. खेळाडू वेगळ्या मानसिकतेत असतील. अंतिम फेरी खूप वेगळी असेल. पाहूया... मी माझी पूर्ण तयारी करून आलो आहे. 

अंतिम फेरीत नीरज चोप्रा विरूद्ध पाकिस्तानचा अर्शद नदीम अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. पण, नीरज नेहमीच पाकिस्तानच्या खेळाडूला वरचढ राहिला आहे. याशिवाय ग्रॅनडा आणि जर्मनीचा खेळाडूही नीरजसमोर आव्हान म्हणून असतील. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीप यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

मंगळवारी नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात यश मिळवले. नीरजने पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८६.८५ मीटर भाला फेकून फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. त्याने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्येही अर्शदने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तो पहिल्या तीनमध्ये न आल्याने त्याला पदक जिंकता आले नाही. दुसरीकडे भारताच्या नीरज चोप्राने ८७.५८ भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. पाकिस्तानचा अर्शद नदीम ८४.६२ मीटर एवढ्या अंतरासह पाचव्या क्रमांकावर राहिला होता. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारतPakistanपाकिस्तानGold medalसुवर्ण पदक