Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. खरे तर पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले होते. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. शनिवारी भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
१० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ खेळाडू होते. फायनलमध्ये सुरुवातीला ५ शॉट्सच्या दोन सीरिज असतात (प्रत्येक शूटरसाठी ५ + ५ शॉट्स (एकूण १० शॉट्स). २५० सेकंदात एक शॉट्स पूर्ण करणे गरजेचे असते. यातील प्रत्येक २ शॉट्सनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळेपर्यंत सर्वात कमी गुण मिळवणारा नेमबाज स्पर्धेबाहेर होत गेला. भारताची मनू भाकर सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकावर होती. कोरियाची खेळाडू अव्वल क्रमांकावर होती. मग मनूची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
Paris Olympic 2024 : खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS
मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
Paris Olympic 2024 : मनू भाकरनं भारतासाठी पदक जिंकलं; विजयानंतर तिनं भगवतगीतेला श्रेय दिलं, वाचा
दरम्यान, भारताच्या मनू भाकरने शनिवारी चमक दाखवून १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५व्या स्थानी राहिली. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्यामुळे भारताच्या रिदिमाचे आव्हान शनिवारीच संपुष्टात आले. फायनलमध्ये अखेरच्या क्षणी मनू दुसऱ्या स्थानी आल्याने भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त रौप्य की कांस्य याची देशवासियांना प्रतीक्षा होती. अखेर २२ वर्षीय मनूने कांस्य पदकाला गवसणी घातली.