Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : रविवारी भारताच्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आज सोमवारी मनूने तिचा सहकारी सरबजोत सिंगसोबत शानदार कामगिरी करून पदकाच्या शर्यतीत कायम राहण्याची किमया साधली. ही जोडी आता कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात असेल. पकदविजेत्या मनूला उद्या मंगळवारी १० मीटर एपीमध्ये सरबजोतसह कांस्य पदक जिंकण्याची आणखी एक संधी आहे.
दरम्यान, पदकविजेती मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांना कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. यापूर्वी रविवारी मनू भाकरने कांस्य पदक जिंकले होते. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांना १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी असेल. उद्या मंगळवारी दोन्ही भारतीय नेमबाज कांस्य पदकासाठी भिडतील.
कोण आहे मनू भाकर?
पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.