Paris Olympics 2 August Schedule : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने कास्यपदक जिंकले. भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. दरम्यान, आज २ ऑगस्ट रोजीही मोठे सामने होणार आहेत. लक्ष्य सेन दोन पदके जिंकणारी मनू भाकरही आज खेळणार आहे. हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा तिरंदाजीत पदक जिंकू शकतात.
तजिंदर पाल सिंह तूर ॲथलेटिक्समध्ये आजपासून खेळायला सुरुवात करणार आहेत.
जाणून घ्या आजचे वेळापत्रक
गोल्फ
पुरुष वैयक्तिक : गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा, दुपारी १२.३० वाजता.
शूटिंग
२५ मीटर पिस्टल महिला पात्रता फेरी : मनू भाकर आणि ईशा सिंह: दुपारी १२.३० वाजता.
शूटिंग
स्कीट पुरुष पात्रता : अनंतजीत सिंह नारुका: दुपारी १.०० वा.
तिरंदाजी
मिश्र सांघिक स्पर्धा : अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा: दुपारी १.१९ वाजता.
रोइंग
पुरुष एकेरी स्कल्स अंतिम डी : बलराज पनवार : दुपारी १.४८ वाजता.
ज्युडो
राउंड ऑफ ३२ : तुलिका मान : दुपारी २.१२ वाजता.
नौकानयन
महिला डिंगी शर्यत ३ : नेत्रा कुमनन : दुपारी ३.४५ वाजता.
नौकानयन
महिला डिंगी शर्यत ४ : नेत्रा कुमनन : दुपारी ४.५३ वाजता.
हॉकी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गट सामना) दुपारी ४.४५ वा.
तिरंदाजी
मिश्र सांघिक उपांत्यपूर्व फेरी : अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा : सायंकाळी ५.४५ (पहिला सामना जिंकल्यास).
बॅडमिंटन
उपांत्यपूर्व फेरी : लक्ष्य सेन, सायंकाळी ६.३० वा.
तिरंदाजी
मिश्र सांघिक उपांत्य फेरी : अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा: संध्याकाळी ७.०१ (पात्र असल्यास).
नौकानयन
पुरुषांची डिंगी शर्यत ३ : विष्णू सरवणन : संध्याकाळी ७.०५
नौकानयन
पुरुषांची डिंगी शर्यत ४ : विष्णू सरवण : रात्री ८.१५ वाजता.
तिरंदाजी
मिश्र सांघिक: अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा, सायंकाळी ७.५४ (पात्र असल्यास)
तिरंदाजी
मिश्र सांघिक अंतिम : अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा: रात्री ८.१३ (पात्र असल्यास)
ऍथलेटिक्स
५००० मी हीट १ (महिला) अंकिता ध्यानी : रात्री ९.४० वा.
ऍथलेटिक्स
५००० मी हीट २ (महिला) पारुल चौधरी : रात्री १०.०६ वा.
ऍथलेटिक्स
शॉट पुट पात्रता (पुरुष) : तजिंदर पाल सिंग तूर, रात्री ११.४० वाजता.