Paris Olympics 2024 ( Marathi News ) : गेल्या आठ दिवसापासून पॅरिस ऑलिम्पिक सुरू आहे. आज नववा दिवस असून भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. काल मनू भाकरने चमकदार कामगिरी केली पण थोडक्यात पदक हुकले. आज रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे मोठे सामने होणार आहेत, यामुळे आजचा दिवसही महत्वाचा असणार आहे. आज भारतीय हॉकी संघ क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळणार आहे.
लक्ष्य सेन आज सेमी फायनलमध्ये खेळणार आहे, लक्ष्य सेनकडून आता असंख्य भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. त्याने आजचा सामना जिंकला तर पदक निश्चित करेल.तसेच लवनिना बोर्गोहेनही बॉक्सिंगमध्ये क्वार्टरफायनलमध्ये खेळणार आहे. तिनेही या सामन्यात विजय मिळवला तर तिचेही मेडल निश्चित आहे.
जाणून घ्या आजचे भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक
नेमबाजी-
पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल क्वालिफिकेशन (स्टेज १) दुपारी १२.३० वाजता अनिश भानवाला, विजयवीस सिद्धू
पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल क्वालिफिकेशन (स्टेज २) दुपारी ४.३० वाजता अनिश भानवाला विजयवीस सिद्धू
महिला स्किट क्वालिफिकेशन दुसरा दिवस दुपारी १ वाजता - महेश्वरी चौहान, रिझा धिल्लोन
महिला स्किट फायनल- सायंकाळी ७ वाजता. (पात्र ठरले तर)
गोल्फ-
पुरुष वैयक्तित स्ट्रोक प्ले चौथी फेरी- दुपारी १२.३० वाजता, शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर
हॉकी-
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन- दुपारी १.३० वाजता
ऍथलेटिक्स
महिला ३००० स्टीपलचेस राऊंड १- पारुल चौधरी, दुपारी १.३५ वाजता
पुरुष ७५ लांब उडी, क्वार्टरफायनल- जेस्विन अल्ड्रिन , दुपारी २.३० वाजता
बॉक्सिंग
महिला ७५ किलो गट क्वार्टरफायनल - लवलिना बोर्गाहेन, दुपारी ३.०२ मिनिटांनी
बॅडमिंटन
पुरुष एकेरी सेमिफायनल - लक्ष्य सेन दुपारी २.२० पासून
सेलिंग
पुरुष डिंघी रेस - विष्णू सर्वनन, दुपारी ३.३५ वाजता
महिला डिंघी रेस , नेत्रा कुमनन , सायंकाळी ६.०५ वाजता.