Imane Khelif news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारताला केवळ सहा पदकांवर समाधान मानावे लागले. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत यावेळी भारताला एक पदक कमी मिळाले. पॅरिस ऑलिम्पिक संपून बराच काळ लोटला आहे, मात्र पुन्हा एकदा या महाकुंभाची चर्चा एका अनोख्या प्रकरणामुळे होत आहे. खरे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियासाठी बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी बॉक्सर इमान खेलिफबाबत मोठा गदारोळ झाला होता. पुरुष असूनही महिलांच्या इव्हेंटमध्ये भाग घेतल्याने हा गोंधळ झाला. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान इमान खेलिफला विरोधही झाला होता, मात्र तरीही ऑलिम्पिक समितीने तिला खेळण्याची संधी दिली.
मात्र, आता या संपूर्ण प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे. इमान खेलिफ ही महिला नसून पुरुष असून चुकीच्या पद्धतीने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. इमान खेलिफाबाबत हा दावा तिच्या उघड झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे करण्यात येत आहे. तिच्या शरीरात अनेक पुरुष अवयव असल्याचे या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. अल्जेरियन बॉक्सर इमान खेलिफचा वैद्यकीय अहवाल एका फ्रेंच पत्रकाराने मिळवला अन् तो प्रसिद्ध केला.
इमान खलीफच्या या संपूर्ण प्रकरणावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. हरभजन सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून इमान खलिफ प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. इमान खलीफबद्दल भज्जीने म्हटले की, ऑलिम्पिक समितीने हे सुवर्ण पदक परत घ्यायला हवे.