पॅरिस: कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावर शनिवारी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने (सीएएस) सुनावणी पुढे ढकलली. रात्री साडेनऊला यावर निकाल येईल अशी चर्चा होती. पण हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निकाल जाहीर होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून (Court of Arbitration for Sports) विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा निकाल सकारात्मक असेल, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक समितीनंही व्यक्त केला आहे. विनेश फोगाट हिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी विनंती केली आहे. जर निकाल तिच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर पडेल.
अमनने दहा तासांत केले ४.६ किलाे वजन कमी: अमन सेहरावतने ५७ किलो वजन गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत विजय मिळविला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अमनचे वजन झाले, तेव्हा ते ४.६ किलो अधिक होते.